एक्स्प्लोर
Photo: नामांतरावरुन एमआयएमचं उपोषण तर मनसेकडून 'स्वाक्षरी मोहीम'
Maharashtra Politics : औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अखेर परवानगी दिली आहे.
Photo: नामांतरावरुन एमआयएमचं उपोषण तर मनसेकडून 'स्वाक्षरी मोहीम'
1/10

औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अखेर परवानगी दिली आहे. मात्र याच निर्णयावरुन आता राजकारण तापले आहे
2/10

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला विरोध केला आहे.
3/10

तर आजपासून (4 मार्च) जलील हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
4/10

तर हे बेमुदत संप कधीपर्यंत सुरु राहिल हे सांगता येणार नसल्याचं देखील जलील यांनी म्हटलं आहे.
5/10

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी तीन वाजेपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात होणार आहे.
6/10

यावेळी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे अनेक नेते देखील उपस्थित राहणार आहेत.
7/10

जलील यांनी शुक्रवारी उपोषणस्थळाची पाहणी करत आढावा घेतला.
8/10

या प्रकरणी पोलिसांनी जलील यांच्याची चर्चा करत उपोषणाबाबत आढावा घेतला आहे.
9/10

सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी जलील यांच्यासोबत चर्चा करत उपोषण कसे असणार, किती लोक येण्याची शक्यता आहे, याबाबत माहिती जाणून घेतली आहे.
10/10

तर मनसेकडून नामांतराच्या समर्थनात आज स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे.
Published at : 04 Mar 2023 11:46 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
वाशिम
महाराष्ट्र


















