एक्स्प्लोर
खाती कमी इच्छुक जास्त, ठाकरे सरकार करणार नव्या खात्यांची निर्मिती?
चांगल्या दर्जाच्या खात्यांसाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार नव्या खात्याची निर्मिती करायच्या विचारात आहे. ही खाती शिवसेनेच्या मंत्र्यांना जाण्याची शक्यता आहे. एकीकडे चांगल्या खात्यांवरुन आणि खातेवाटपावरुन महाविकासआघाडी घोळ संपता संपत नसल्याचे चित्र आहे.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांच्या खातेवाटप अजून झालेलं नाही. त्यात शिवसेनेनं आपल्या खात्यातील मंत्रीपदांवर अपक्ष आमदारांना संधी दिली. त्यामुळेच चांगल्या दर्जाच्या खात्यांसाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार नव्या खात्याची निर्मिती करायच्या विचारात आहे. ही खाती शिवसेनेच्या मंत्र्यांना जाण्याची शक्यता आहे. एकीकडे चांगल्या खात्यांवरुन आणि खातेवाटपावरुन महाविकासआघाडी घोळ संपता संपत नसल्याचे चित्र आहे. शिवसेने तीन अपक्षांना मंत्रीपदं मिळाली. आणि यामुळे पक्षातील अनेक जण नाराज झाले. असं असताना काही नवीन खाती निर्माण करण्याच्या विचारात सरकार आहे. मेट्रो रेल्वे, वाणिज्य, तीर्थक्षेत्रं विकास आणि मुख्यमंत्री कार्यालय ही चार नवीन खाती तयार होऊ शकतात. या खात्यांबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. महाविकासआघाडीतील पक्षांच्या वाट्याला आलेली खाती
- शिवसेनेच्या वाट्याला नगरविकास, परिवहन, उद्योग, कृषी अशी महत्त्वाची खाती आली आहेत.
- काँग्रेसच्या वाट्याला महसूल, शालेय शिक्षण, उर्जा, सार्वजनिक बांधकाम ही खाती आली आहेत
- राष्ट्रवादीच्या वाट्याला गृह, जलसंपदा, अर्थ अशी महत्त्वाची खाती आली आहेत.
आणखी वाचा























