महसूल आणि कृषी खातं मिळवण्यासाठी अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरातांमध्ये रस्सीखेच
राज्य मंत्रीमंडळाच्या खातेवाटपानंतर महसूल खातं हे काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. हे खातं आपल्याला मिळावं यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यात रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे.
मुंबई : महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार दोनच दिवसांपूर्वी पार पडला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 36 आमदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदांची शपध घेतली. परंतु महाविकास आघाडीचे खातेवाटप अद्याप झालेले नाही. तीनही पक्ष मलाईदार खाती स्वतःकडे घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये महसूल खातं हे काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. हे खातं आपल्याला मिळावं यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यात रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे.
काँग्रेसने महाविकास आघाडीकडे कृषी मंत्रीपदही मिळावं अशी मागणी केली आहे. महसूल आणि कृषी अशी दोन खाती मिळाली तर त्यापैकी एक खातं बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवलं जाईल, तर दुसरं खातं अशोक चव्हाणांच्या पदरात पडेल. सध्या कृषी खातं शिवसेनेकडे आहे.
थोरात आणि चव्हाण यांच्यात रस्सीखेच सुरु असताना काँग्रेस हायकमांड कोणाच्या डोक्यावर हात ठेवणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान शिवसेनेच्या वाट्याला आलेलं कृषी खातं काँग्रेसला मिळावं, अशी इच्छादेखील थोरातांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांनी आज दिल्लीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधींची भेट घेतली. काँग्रेसच्या विचारसरणीशी तडजोड होता कामा नये, असा सल्ला सोनिया गांधी यांनी नव्या मंत्र्यांना तसेच आमदारांना दिला आहे.
Maharashtra Cabinet : ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाची ठळक वैशिष्ट्येमंत्र्यांची यादी
शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे (मुंबई) अनिल परब (मुंबई) उदय सामंत (रत्नागिरी) गुलाबराव पाटील (जळगाव) दादा भुसे (मालेगाव, नाशिक) संजय राठोड (दिग्रस, यवतमाळ) संदीपान भुमरे (पैठण, औरंगाबाद) शंकरराव गडाख , नेवासाचे अपक्ष आमदार (नेवासा, अहमदनगर) अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) (सिल्लोड, औरंगाबाद) राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (शिरोळ, कोल्हापूर) शंभूराज देसाई (राज्यमंत्री) (पाटण, सातारा) बच्चू कडू, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (अचलपूर, अमरावती) काँग्रेसचे मंत्री के.सी.पाडवी (धुळे) (अक्कलकुवा, नंदुरबार) अशोक चव्हाण (नांदेड) अमित देशमुख (लातूर) यशोमती ठाकूर (अमरावती) विजय वड्डेटीवार (चंद्रपूर) सुनील केदार (नागपूर) अस्लम शेख (मुंबई) वर्षा गायकवाड (मुंबई) सतेज पाटील (राज्यमंत्री) (कोल्हापूर) विश्वजित कदम (राज्यमंत्री) (सांगली) राष्ट्रवादीचे मंत्री अजित पवार (उपमुख्यमंत्री) (बारामती, पुणे) दिलीप वळसे पाटील (आंबेगाव, पुणे) धनंजय मुंडे (परळी, बीड) अनिल देशमुख (नागपूर) डॉ. राजेंद्र शिंगणे (सिंदखे़ड राजा, बुलडाणा) हसन मुश्रीफ (कागल, कोल्हापूर) जितेंद्र आव्हाड (ठाणे) नवाब मलिक (मुंबई) बाळासाहेब पाटील (कराड, सातारा) राजेश टोपे (अंबड, जालना) प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) (अहमदनगर) दत्ता भरणे (राज्यमंत्री) (इंदापूर) अदिती तटकरे (राज्यमंत्री) (रायगड) संजय बनसोडे (राज्यमंत्री) (उदगीर, लातूर)