एक्स्प्लोर

Cidco Lottery 2024 : गुड न्यूज, सिडकोकडून नवी मुंबईतील 902 घरांसाठी लॉटरी,जाणून घ्या योजनेचं संपूर्ण वेळापत्रक  

Cidco Lottery 2024 : नवी मुंबईतील 902 घरांसाठी सिडकोनं लॉटरी काढली आहे. त्या घरांच्या सोडतीसाठी आजपासून नोंदणी करता येईल.   

नवी मुंबई : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित म्हणजेच सिडको यांच्याकडून नवी मुंबईतील 902 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. नवी मुंबईत घर घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील सिडकोच्या कळंबोली, खारघर आणि घणसोली येथील घरांसह व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तूविहार सेलीब्रेशन येथील एकूण सिडकोकडून 902  घरांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर या योजनेच्या सोडतीसाठी दुपारी बारा वाजल्यापासून अर्ज दाखल करता येतील.  

सिडकोच्या वेबसाईटवर या 902 घरांसाठी नोंदणी करता येणार आहे. या घरांसाठी अर्ज सादर करण्यासाठी सिडकोच्या वेबसाईटवर 27 ऑगस्ट म्हणजेच आज दुपारपासून सुरुवात होणार आहे. 

योजनेचं वेळापत्रक

ऑनलाईन अर्ज नोंदणी : 27 ऑगस्ट 2024 दुपारी 12 वाजता नोंदणी सुरु ते  25 सप्टेंबरपर्यंत 
सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात : 27 ऑगस्ट 2024 दुपारी 12 वाजता नोंदणी सुरु ते  26 सप्टेंबरपर्यंत 
ऑनलाईन शुल्क भरणा : 27 ऑगस्ट ते 27 सप्टेंबर
संगणकीय सोडत : 10 ऑक्टोबर   

सिडकोच्या घरांची वैशिष्ट्ये

९०२ एवढ्या प्रमाणावर सदनिका उपलब्ध

रस्ते, रेल्वे, मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी

आधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण गृहसंकुले

शाळा, महाविद्यालय, रुग्णालय इ. मूलभूत सुविधांनी परिपूर्ण परिसर

विकसित नोडमध्ये व मोक्याच्या ठिकाणी असणारी गृहसंकुले

घणसोली, खारघर व कळंबोली नोडमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या सदनिकांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रु. २.५० लाखांचे अनुदान उपलब्ध


सिडकोची ही घरं आर्थिक दृष्ट्या  दुर्बल घटक, खुला प्रवर्ग, मध्यम उत्पन्न गटांसाठी असतील. कळंबोली, खारघर आणि घणसोली येथे एकूण 213 घरं आहेत. यापैकी 175 सर्वसामान्य प्रवर्गासाठी तर 38 घरं आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी आहेत. खारघरमध्ये सिडकोचे सप्नपूर्ती आणि वास्तूविहार सेलीब्रेशन हे प्रकल्प देखील आहेत. तिथं 689 घरं उपलब्ध आहेत. 

सिडकोच्या घरांची किंमत किती? 

सिडकोच्या घरांची किंमत कमीत कमी 26 लाखांपासून 2 कोटी रुपयांपर्यंत आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिक, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही घरं उपलब्ध आहेत. सिडकोनं अधिकृत वेबसाईटवर अर्ज नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे. 

दरम्यान, म्हाडानं मुंबईत 2030 घरांची लॉटरी काढलेली असताना लगेचच सिडकोची लॉटरी देखील जाहीर झाल्यानं मुंबई आणि नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. सिडकोच्या या योजनेची सोडत 10 ऑक्टोबरला होणार आहे. ज्या नागरिकांना घर घ्यायचं आहे ते सोडतीसाठी नोंदणी करु शकतात. 

संबंधित बातम्या : 

Cidco Lottery 2024 : गुड न्यूज, नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, 902 घरांसाठी सिडकोकडून लॉटरी, जाणून घ्या घरांची किंमत? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
Delhi Election : चला, महाठग अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'वर फेरफटका मारुया! भाजपकडून थेट तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Video : चला, महाठग अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'वर फेरफटका मारुया! भाजपकडून थेट तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Shivsena Thackeray Camp: आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांनी ठणकावून सांगितलं
आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांनी ठणकावून सांगितलं
Weather Update: राज्यात येत्या 48 तासात तापमानात चढ-उतार, कुठे काय स्थिती? वाचा IMD सविस्तर अंदाज 
सूर्याचे उत्तरायण सुरू, येत्या 48 तासात तापमानात मोठे बदल, वाचा IMD सविस्तर अंदाज 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Achyut Palav Padma Shri Award : सुविचार लिहिण्यापासून ते पद्मश्रीपर्यंतचा प्रवास; अच्युत पालवABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 27 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Baramati Speech : ड्रोनच्या घिरट्या ते लाडकी बहीण योजना, दादांचं पुण्यात भाषणMahendra Dalvi on Sunil Tatkare : भरतशेठ पालकमंत्री होईपर्यंत तटकरेंना कायम अंगावर घेईन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
Delhi Election : चला, महाठग अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'वर फेरफटका मारुया! भाजपकडून थेट तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Video : चला, महाठग अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'वर फेरफटका मारुया! भाजपकडून थेट तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Shivsena Thackeray Camp: आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांनी ठणकावून सांगितलं
आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांनी ठणकावून सांगितलं
Weather Update: राज्यात येत्या 48 तासात तापमानात चढ-उतार, कुठे काय स्थिती? वाचा IMD सविस्तर अंदाज 
सूर्याचे उत्तरायण सुरू, येत्या 48 तासात तापमानात मोठे बदल, वाचा IMD सविस्तर अंदाज 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Embed widget