एक्स्प्लोर
स्कार्फचा गळफास बसल्याने नऊ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
झोळीमध्ये झोपलेल्या 9 महिन्यांच्या बाळाला स्कार्फचा गळफास बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आराध्या खाडपे असं या बाळाचा चिमुकलीचं नाव आहे.
नाशिक : झोळीमध्ये झोपलेल्या 9 महिन्यांच्या बाळाचा स्कार्फचा गळफास बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आराध्या खाडपे असं या चिमुकलीचं नाव आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजीनगरच्या समर्थ रेसिडन्सीमधील ही घटना आहे.
योगेश खाडपे आपली पत्नी आणि 9 महिन्यांच्या आराध्यासह सातपूर येथे भाड्याच्या खोलीत राहतात. आज दुपारी आराध्याला झोळीमध्ये झोपवून आई मनीषा खडपे या घरातील कामं करत होत्या.
झोपेत खाली पडू नये म्हणून त्यांनी काळजीपोटी झोळीला स्कार्फ बांधला होता. मात्र अचानक झोपेत खाली सरकत आलेल्या आरध्याला स्कार्फचा गळफास बसला.
आराध्याच्या मृत्यूनं खाडपे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच पालकांनी आपल्या लहान मुलांकडे लक्ष ठेवावं, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement