एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nashik Cycle Wari : नाशिक ते पंढरपूर सायकलवारी, 350 हून अधिक सायकलपटूंचा सहभाग, पंढरपूरला सायकल रिंगण

Nashik Cycle Wari : नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे 350 सदस्य पंढरपूर वारीसाठी (Ashadhi Wari) रवाना झाले.

Nashik Cycle Wari : जय हरी विठ्ठल... जय हरी विठ्ठल असा होणारा जयघोष... ढोल ताशांचा होणारा गजर..... अन् पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नाशिक सायकलपटू फाऊंडेशनचे 350 सदस्य पंढरपूर वारीसाठी (Ashadhi Wari) रवाना झाले. याचबरोबर या वारीत जवळपास 55 महिला सायकलपचू  सहभागी होणार असून उद्या सायकलवारी पंढरपूरला पोहचणार आहेत. 

पंढरीच्या वारीसाठी (Pandharpur Wari) वारकरी आसुसलेला असून आता नाशिकच्या सायकलपटू फाऊंडेशनच्या (Cyclist Foundetion)  माध्यमातून 350 हुन अधिक सायकलपटू पंढरपूरला रवाना झाले आहेत. नाशिक (Nashik Cyclist) सायकलपटू फाउंडेशनच्या वतीने आयोजित नाशिक पंढरपूर सायकल वारीला सकाळी इंदिरानगर येथील मनोहर गार्डन येथून सुरुवात झाली. सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सायकलवारीचे आयोजन करण्यात येते. विठू नामाच्या गजरात सकाळी इंदिरानगर येथून सायकल वारी निघाली संध्याकाळी सिन्नर राहुरी मार्गे अहमदनगर येथे मुक्कामी पोहचली. आज सकाळी सहा वाजता निघून करमाळा टेंभुर्णीमार्गे पंढरपूर येथे पोहोचणार आहे. सर्व सायकलपटू उद्या पंढरपूरला एकत्र नगर प्रदक्षिणा सायकल रिंगण व सायकल संमेलन घेणार आहेत. 

दहा वर्षांपूर्वी नाशिक (Nashik) सायकलपटू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिष बैजल यांनी सायकल दिंडी ही संकल्पना मांडून प्रत्यक्ष अंमलात आणत सायकल दिंडी यशस्वी केली. तेव्हापासून आजतागायत अखंडपणे दहा वर्षे नाशिक सायकलपटू फाउंडेशनचे हौशी सदस्य मोठ्या हिरिरीने या दिंडीत भाग घेत असतात. आज नाशिक येथून भक्तिरसमय आणि पर्यावरणपूरक सायकल दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाली. दिंडी मार्गात हे सायकलपटू पर्यावरण वाचविण्याच्या दृष्टीने संदेश देणार असून, यासाठी ठिकठिकाणी वृक्षारोपण तसेच झाडे लावा झाडे जगवा, हेल्मेटचा वापर, व्यसनमुक्ती, बेटी बचाव बेटी पढाव - आदी विषयांवर पथनाट्य देखील सादर करणार आहे. नाशिकसह राज्याच्या विविध ठिकाणांहून सायकल दिंडीत आलेले हे वारकरी 11 जून रोजी सायकलीने पंढरपूर नगरीची प्रदक्षिणा करणार आहेत. त्यानंतर एक-एक क्लब रेल्वे मैदानावर रिंगण करून उभे राहतील. 

असा आहे सायकलवारीचा मार्ग 

सकाळी इंदिरानगर येथून सायकल वारी निघाली. त्यांनंतर संध्याकाळी सिन्नर राहुरी मार्गे अहमदनगर येथे मुक्कामी पोहचली. आज सकाळी सहा वाजता निघून करमाळा टेंभुर्णीमार्गे पंढरपूर येथे पोहोचणार आहे. सर्व सायकलपटू उद्या पंढरपूरला एकत्र नगर प्रदक्षिणा सायकल रिंगण व सायकल संमेलन घेणार आहेत. सायकलवारीत नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, सिन्नर, राहुरी, देवळा, सटाणा, चाळीसगाव, परभणी, कोपरगाव, लोणी, उमरगाव, लातूर, खडकवासला, इचलकरंजी, सोलापूर, कोरेगाव, सातारा, उंब्रज, माढा, कराड, कोल्हापूर, सांगली, नातेपुते, धुळे, ठाणे, नवी मुंबई, पुणे व इतर शहरातील सायकलपटू सहभागी होणार आहेत होत आहेत. रॅलीमध्ये प्रथमच नाशिक जिल्ह्यातून 55 महिला सहभागी झाले आहेत. यांच्याबरोबर 13 स्टॅंडम सायकलवर 25 दिव्यांग सायकली सहभागी झाले आहेत यामध्ये तीन अंध महिलांचा देखील समावेश आहे.

उन्हापासून संरक्षण 

दरम्यान सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून अशातच नाशिक येथून सायकलवारीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. अशातच ऊन वाढत असल्याने अनेक सायकलपटू डोक्यावर रुमाल बांधून, कडुलिंबाच्या पानांनी उन्हापासून संरक्षण करत आहेत. शुक्रवारी निघालेली सायकलवारी काल सायंकाळी अहमदनगर शहरात पोहचली. या ठिकाणी मुक्काम करून आज सोलापूरमार्गे पंढपुरात दाखल होणार आहे. नाशिकसह राज्याच्या विविध ठिकाणांहून सायकल दिंडीत आलेले हे वारकरी 11 जून रोजी सायकलीने पंढरपूर नगरीची प्रदक्षिणा करणार आहेत. त्यानंतर एक-एक क्लब रेल्वे मैदानावर सायकल रिंगण होणार असून सायकल संमेलनाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

EKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024Ramadas kadam Sai Darshan : रामदास कदम-धनंजय मुंडे शिर्डीत साईचरणी लीनChhagan Bhujbal On Devendra Fadnavis : भुजबळांची फडणवीसांसाठी बॅटिंग की चांगल्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
Embed widget