Nashik Crime : नाशिक हादरलं! बाप-लेकांकडून नात्यातीलच विवाहितेवर वीस दिवस अत्याचार!
Nashik Crime : नाशिकरोड (Nashikroad) येथील विवाहितेचे नातेवाइक असलेल्या पिता-पुत्रांनी अत्याचार (Molestation) केल्याची घटना घडली आहे.
Nashik Crime : नाशिकरोड (Nashikroad) येथील विवाहितेचे नातेवाइक असलेल्या पिता-पुत्रांनी अत्याचार (Molestation) केल्याची घटना घडली आहे. पीडितेला बळजबरीने गाडीत बसवून घरातील रोख रक्कम, महत्वाचे कागदपत्रेही त्यांनी पळविण्यात आली. याप्रकरणी पीडित महिलेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याने कोर्टाच्या आदेशानुसार उपनगर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक (Nashik) शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या (Upnagar Police Station) हद्दीत एका महिलेच्या घरात घुसून तीन संशयितांनी चाकूचा धाक दाखवून तिला जालना येथे घेऊन जात वीस ते 22 दिवस सातत्याने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात उघडकीस आली आहे. दरम्यान पीडित महिलेने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नाशिक रोड यांच्या न्यायालयात दिलेल्या तक्राराच्या सुनावणीनंतर न्यायालयाच्या आदेशानुसार उपनगर पोलीस ठाण्यात तीनही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला 22 फेब्रुवारीला घरी एकटी असताना संशयित प्रकाश किसन सदावर्ते व कुमार किसन सदावर्ते यांच्यासह सुनिता सदावर्ते हे तिन्ही संशयित घरात घुसले. त्यातील एकाने तिच्या गळ्याला चाकू लावला तर दोघांनी कपाटातील 50 हजार रुपयांचे रोख रक्कम काढून घेतली. तसेच कपाटातील महत्त्वाची कागदपत्रे म्हणजेच खरेदीखत, बँक पासबुक, एटीएम कार्ड, रेशन कार्ड आदी कागदपत्रे काढून घेतली. त्यानंतर तिघांनी तिला कारमध्ये बसवून जालना येथे नेले. त्या ठिकाणी प्रकाश सदावर्ते व कुमार सदावर्ते या दोघं बापलेकांनी संबंधित विवाहितेवर अत्याचार केले.
तर संशयित सुनीता सदावर्ते हीने जालना येथील तिच्या घरात विवाहतेला कोंडून ठेवले. त्याचबरोबर दोघं बापलेकांनी संगणमत करून महिलेवर वीस ते 22 दिवस अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यादरम्यान पीडित महिलेने तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाईसाठी नाशिकरोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्तिधाम परिसरातील प्रकार
सदर महिला मुक्तीधाममागील आनंद नगरमध्ये राहते. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या 22 फेब्रुवारीला सकाळी विवाहिता घरी एकटी असताना तिचे दाजी प्रकाश किसन सदावर्ते आले. रात्री दोनच्या सुमारास आत्याचा मुलगा कुमार किसन सदावर्ते चार संशयित इसम घेऊन आला. त्यांनी विवाहितेच्या गळ्याला चाकू लाऊन ५० हजार रुपये, खरेदी खत, बँक पासबुक, एटीएम कार्ड, रेशनकार्ड आदी कागदपत्रांसह पीडितेला बळजबरीने गाडीत बसवून जालना जिल्ह्यातील शेवडी गावी नेले. नातेवाइक सुनीता सदावर्ते यांनी घरात चार दिवस कोंडून ठेवून मारहाणीसह अत्याचार केले.