'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
आनंद दिघे यांच्या जीवनपटाचा भाग 2 म्हणजेच धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा बहुचर्चित सिनेमा शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला
!['ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो Dharmveer 2 ticket free If you want an answer of question and Free show by ShivSena Shital Mhatre 'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/30/606eff330f3083620559cae9f1d6a14717276927860631002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : धर्मवीर चित्रपटानंतर राज्याच्या राजकारणात मोठं बंड झालं अन् दिवंगत आनंद दिघे (Anand dighe) यांचे शिष्य असलेल्या एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर, धर्मवीर 2 सिनेमा येणार असल्याची घोषणा दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केली होती. त्यामुळे, सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळातही या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागून होती. अखेर, राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अगोदर 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 (Dharmveer 2) मुक्काम पोस्ट ठाणे.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. त्यावरुन, शिवसेना शिंदे व शिवसेना ठाकरे गटातील नेते आमने-सामने आले आहेत. त्यातच, दिवंगत आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी धक्कादायक वक्तव्य केल्यामुळे हा वाद आणखी चिघळला आहे. त्यामुळे, शिवसेना शिंदे गटाकडून या सिनेमाचं चांगलंच प्रमोशन सुरू आहे. आता, शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांच्याकडून हा सिनेमा मोफत दाखवण्यात येत आहे.
आनंद दिघे यांच्या जीवनपटाचा भाग 2 म्हणजेच धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा बहुचर्चित सिनेमा शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. अपेक्षेप्रमाणे शिवसेना शिंदे गटाकडून या चित्रपटाचे स्क्रिनींग अनेक ठिकाणी मोफत करण्यात आले. तर, शिंदेंच्या शिवसैनिकांनी चित्रपटावर चर्चाही सुरू केली आहे. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित करत शिंदेंच्या शिवसेनेकडून राजकीय नेरेटीव्ह पसरवला जात असल्याचा आरोप केला जातोय. तर, आनंद दिंघेंना बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठं करण्याचा प्रयत्न होतोय, अशी थेट टीका संजय राऊत यांनी केलीय. आता, धर्मवीर 2 सिनेमावरुन शिंदेंचे आमदार संजय शिरसाट आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यात जुंपल्याचं दिसून आलं. त्यातच, शिवसेना शिंदे गटाकडून राज्यातील अनेक ठिकाणी या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन करण्यात आले. अद्यापही हा चित्रपट मोफत दाखवून शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गुरु-शिष्याप्रतीचा आदर व्यक्त करत आहेत.
आता, शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी त्यांच्या दहीसर विधानसभा मतदारसंघात हा सिनेमा मोफत आयोजित केला आहे. दहीसर मतदारसंघातील शिवसैनिकांसाठी 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता हा सिनेमा मोफत दाखविण्यात येत आहे. Who is Eknath Shinde? या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर धर्मवीर 2 हा सिनेमा आवर्जून पाहावा, असेही शितल म्हात्रे यांनी आपल्या ट्विटरवरुन म्हटलं आहे.
Who is Eknath Shinde?
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) September 30, 2024
ह्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल त्यांनी धर्मवीर 2 हा अप्रतिम सिनेमा जरुर पाहावा… #dharmveer2 #धर्मवीर२ @mieknathshinde @Shivsenaofc @DrSEShinde pic.twitter.com/YlZhlvBwHj
27 सप्टेंबर रोजी सिनेमा प्रदर्शित
दरम्यान, प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात प्रसाद ओक आणि क्षितिज दाते हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रसाद ओकने आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय मंडळी उपस्थित होती. येत्या 27 सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यानंतर, आता या सिनेमावरुन शिवसेना शिंदे गट व ठाकरे गटांत जुंपल्याचं दिसून येत आहे. यामध्ये, एकनाथ शिंदेंचं उदात्तीकरण करण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)