एक्स्प्लोर

गूडन्यूज! मुंबईत दाबलं बटण, गावाकडं आले पैसे; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार अनुदान जमा

अनुदान स्वतंत्ररीत्या वितरण करण्यासाठी लेखाशीर्षासह महाआयटीद्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले होते.

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दानुसार मागील वर्षी भाव पडल्याने नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतून आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे, जास्तीत जास्त 10 हजार रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे.  

एका क्लिकवर सुमारे 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर 2389 कोटी 93 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. 2023 च्या खरीप हंगामात एकूण 96 लाख 787 खातेदार शेतकरी हे सोयाबीन व कापूस उत्पादक होते. त्यानुसार त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने एकूण 4194 कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी 1548 कोटी 34 लाख रुपये कापूस तर सोयाबीनसाठी 2646 कोटी 34 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. 

अनुदान स्वतंत्ररीत्या वितरण करण्यासाठी लेखाशीर्षासह महाआयटीद्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले होते. त्यावर शेतकऱ्यांची स्वतःची संमतीपत्र व बँक खाते, आधार इत्यादी माहिती जमा करून ती माहिती जुळणे आवश्यक असल्याने यामध्ये काही कालावधी लागला. आज जवळपास 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांना आपण याद्वारे लाभ दिला असल्याची माहिती कृषि विभागाकडून देण्यात आली. आधार व अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहील तसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाईल, असेही राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

सोयाबीनला किमान 4892 प्रतिक्विंटलचा हमीभाव 

केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही 4 हजार 892 रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली असून, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांसह वेळोवेळी पाठपुरावा केला. सोबतच या मागणीला समर्थन देणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे देखील मंत्री मुंडे यांनी यावेळी आभार व्यक्त केलेत. तसेच, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

हेही वाचा

राज्यात शिक्षक पदांची निर्मित्ती, कोतवालांचं मानधन वाढवलं; मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus : टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
Kaun Banega Crorepati 16 : बोनी कपूरांचं खरं नाव माहीत आहे का? केबीसी कंटेस्टेंटला उत्तर आलं नाही, ऑडियन्स पोल घेतलात, तर तिथंही उत्तर चुकलं!
Video : बोनी कपूरांचं खरं नाव माहीत आहे का? केबीसी कंटेस्टेंटला उत्तर आलं नाही, ऑडियन्स पोल घेतलात, तर तिथंही उत्तर चुकलं!
महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
Australia vs India, 2nd Test : मिशेल स्टार्कचा किंग कोहलीला गुलिगत धोका, शिकार होताच बघतच राहिला!
Video : मिशेल स्टार्कचा किंग कोहलीला गुलिगत धोका, शिकार होताच बघतच राहिला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Mahayuti : गृहखातं कुणाला मिळणार? संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 06 December 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सCM Devendra Fadanvis Interview : मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली मुलाखत EXCLUSIVEABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 06 December 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus : टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
Kaun Banega Crorepati 16 : बोनी कपूरांचं खरं नाव माहीत आहे का? केबीसी कंटेस्टेंटला उत्तर आलं नाही, ऑडियन्स पोल घेतलात, तर तिथंही उत्तर चुकलं!
Video : बोनी कपूरांचं खरं नाव माहीत आहे का? केबीसी कंटेस्टेंटला उत्तर आलं नाही, ऑडियन्स पोल घेतलात, तर तिथंही उत्तर चुकलं!
महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
Australia vs India, 2nd Test : मिशेल स्टार्कचा किंग कोहलीला गुलिगत धोका, शिकार होताच बघतच राहिला!
Video : मिशेल स्टार्कचा किंग कोहलीला गुलिगत धोका, शिकार होताच बघतच राहिला!
Simhastha Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या खर्चासाठी घेतला हात आखडता? नाशिक मनपाचा आराखडा 15 हजारांवरुन सात हजार कोटींवर; नेमकं कारण काय?
कुंभमेळ्याच्या खर्चासाठी घेतला हात आखडता? नाशिक मनपाचा आराखडा 15 हजारांवरुन सात हजार कोटींवर; नेमकं कारण काय?
Australia vs India, 2nd Test : मिशेल स्टार्क पुन्हा काळ बनून आला; यशस्वी जैस्वाल पहिल्याच बाॅलवर अन् किंग कोहली, राहुलची स्वस्तात शिकार!
मिशेल स्टार्क पुन्हा काळ बनून आला; यशस्वी जैस्वाल पहिल्याच बाॅलवर अन् किंग कोहली, राहुलची स्वस्तात शिकार!
Fake Doctor Racket in Gujarat : गुजरातमध्ये 70 हजारात फेक वैद्यकीय डिग्री देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! 14 बोगस डॉक्टर अटकेत, आठवी पासवाल्याकडूनही उपचार
गुजरातमध्ये 70 हजारात फेक वैद्यकीय डिग्री देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! 14 बोगस डॉक्टर अटकेत, आठवी पासवाल्याकडूनही उपचार
Kolhapur News : कोल्हापुरात विषबाधेनं दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन सख्ख्या चिमुकल्यांचा अंत झाल्याने संशय बळावला
कोल्हापुरात विषबाधेनं दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन सख्ख्या चिमुकल्यांचा अंत झाल्याने संशय बळावला
Embed widget