Pune : धक्कादायक! पुण्यात उच्चशिक्षीत महिलेला 3.5 कोटी रुपयांना गंडा
चायना मध्ये तुमच्या नावाने ड्रग्स पाठवलेत असं म्हणत महिलेला ३.५० कोटी रुपयांचा गंडा
उच्च शिक्षित महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा
शांघाई शहरात पाठविलेल्या कुरिअरमध्ये एटीएम कार्ड, अमली पदार्थ सापडले आहेत असं सांगत केली फसवणूक
याप्रकरणी पुण्यातील मगरपट्टा सिटीत राहणाऱ्या महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे
याप्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल
ही घटना २२ जून ते १५ सप्टेंबर २०२४ या दरम्यानच्या काळात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, हा सगळा प्रकार जून ते सप्टेंबर दरम्यान घडला. तक्रारदार महिला या संगणक अभियंता असून एका आय टी कंपनी मध्ये त्या कार्यरत आहेत. सायबर चोरट्याने तक्रारदार फिर्यादी यांना संपर्क करून आधी कुरिअर कंपनीतून त्यानंतर मुंबई पोलिस आणि सी बी आय मधून बोलत असल्याचे सांगितले. "तुमच्या नावाने मुंबई ते शांघाई पार्सल पाठविले जात असून, त्यात मोठ्या प्रमाणात एटीएम कार्ड, चार किलो कपडे आणि अमली पदार्थ सापडले आहेत" असं सांगितलं.
यावर सायबर चोरटे थांबले नाहीत, त्यांनी महिलेला त्यांच्या बँक खात्यावरील पैसे सरकारी सुरक्षा खात्यावर पाठवून तपासायचे असल्याचे सांगून तीन कोटी ५६ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली
याप्रकरणी आता पुढील तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे