Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 03 PM : ABP Majha
Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 03 PM : ABP Majha
मराठा आरक्षणावरचा माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीमध्ये मोठी वाढ , ग्रॅच्युटीची मर्यादा १४ लाखांवरुन २० लाखांवर , मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय.
शालेय विभागासाठी देखील राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, ४ हजार ८६० विशेष शिक्षकांच्या पदाला मान्यता
राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ, ४० हजार होमगार्डना लाभ होणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयातूून होमगार्डना दिलासा.
कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ, अनुकंपा धोरणाही लागू, ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान मिळणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय.
ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला राज्य सरकार गती देणार, एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय.