एक्स्प्लोर
सप्तशृंगी गडावर दसऱ्याला बोकड बळी, डीजे, शूटिंगला बंदी, अशी आहे नियमावली!
Saptashrungi Devi : सप्तशृंगी देवी वणी गडावर उद्या साजरा होणाऱ्या दसरा सणासाठी जय्यत तयारी झाली असून यंदा बोकड बळी विधीला परवानगी दिल्यानंतर काही नियमांच्या अधीन राहून हा विधी पार पाडण्यात येणार आहे.
Saptashrungi Devi : सप्तशृंगी देवी वणी गडावर उद्या साजरा होणाऱ्या दसरा सणासाठी जय्यत तयारी झाली असून यंदा बोकड बळी विधीला परवानगी दिल्यानंतर काही नियमांच्या अधीन राहून हा विधी पार पाडण्यात येणार आहे. मात्र न्यायालयाने घालून दिलेल्या अटी शर्ती पाळून हा विधी करावा लागणार आहे.
सप्तशृंग गडावर शेकडो वर्षांची परंपरा असलेली बोकडबळीची प्रथा गेल्या पाच वर्षांपासून तत्कालीन विश्वस्त मंडळ व जिल्हा प्रशासनाने बंद केली होती. या निर्णयाविरोधात सुरगाणा तालुक्यातील धोडंबे आदिवासी विकास संस्था यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन ही प्रथा पुन्हा पारंपरिक पद्धतीने सुरू करण्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे उद्या दसऱ्याच्या दिवशी नियमांच्या अधीन राहून विधी पार पाडला जाणार आहे.
सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट ग्रामपंचायत स्थानिक ग्रामस्थ भाविक प्रतिनिधी व इतर प्रतिनिधी यांच्या हरकती निवेदन याबाबत बैठक घेण्यात आली. दरम्यान उच्च न्यायालयाच्या 26 सप्टेंबर रोजीच्या सुनावणीमध्ये दिलेल्या सूचनानुसार सप्तशृंगी देवी ट्रस्ट ग्रामपंचायत यांच्याकडून बोकड बळीविधी प्रथा बाबत नियमावली मागविण्यात आली असून त्यानुसार बोकड बळी विधी बाबत काही मार्गदर्शक तत्त्व तयार करण्यात आले आहेत.
बोकड बळी विधीची पूर्वीची पूर्वतयारी...
विजयादशमीच्या दिवशी वर्षातून फक्त एकाच वेळी व एकच बोकड बळी देण्याची परवानगी असेल. नवरात्र उत्सव विजयादशमीच्या दिवशी बोकड बळी विधी चढण पायरी मार्गावरील दसरा टप्पा येथे करण्यात येईल. बोकड बळी पूजा विधीचा अवधी एक तास राहील. बळी देण्यासाठी वापरण्यात येणारा बोकड हा निरोगी व लंपी रोग नसल्याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांचा दाखला घेणे बंधनकारक राहील.
बोकड बळी विधी दरम्यान करावयाची उपायोजना....
विजयादशमीच्या दिवशी बळी दिल्या जाणारा बोकड हा शिवालय तीर्थ येथे स्नान घालून अंदाजे साडेनऊ वाजता मिरवणूक सुरू करून सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट कार्यालयात अंदाजे पावणेदहा वाजता आणण्यात येईल. सदर मिरवणुकीमध्ये अंदाजे 50 ते 70 भावीक ग्रामस्थ उपस्थित राहतील. त्यानंतर ट्रस्ट कार्यालयातून मारुती मंदिर मार्गे सप्तशृंगी निवासिनी देवीचे दर्शन करून दसरा टप्प्यावर अंदाजे सव्वा दहा वाजता बोकडांना जाईल. मिरवणुकीत सहभागी भाविक ग्रामस्थ यांना पहिल्या पायरीच्या पुढे वर जाण्यास प्रतिबंध असेल. पहिल्या पायरीनंतर फक्त दोन मानकरी व एक बोकड यांना मंदिरात जाण्यास परवानगी दिली जाईल. बोकड बळी विधी दरम्यान 30 मिनिटांकरिता भाविकांना पायरी मार्गाने वर जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. सदर ठिकाणी कोणताही भाविक ग्रामस्थ व कर्मचारी वर्गाला नोटेला रक्त लावणार नाही.
बोकड बळी विधीप्रसंगी बंदुकी द्वारे हवेत सलामी देण्यात येणार नाही. बोकड बळी विधीच्या वेळी चित्रीकरण करता येणार नाही. सदर घटनांचे चित्रीकरण केल्यास दहा हजाराचा दंड संबंधितांवर करण्यात येईल बोकड बळी विधीच्या वेळी ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजे डॉल्बी वाजवण्यास सक्त मनाई राहील. बोकड बाई साठी नेमून देण्यात आलेल्या जागेव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी बोकड बळी देण्यास करण्यास सक्त मनाई राहील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
कोल्हापूर
सोलापूर
Advertisement