Chhagan Bhujbal : विद्देची देवता सरस्वती पण तिला शिकू दिले नाही, लक्ष्मी आहे पण महिलांच्या हातात पैसे जाणार नाहीत : छगन भुजबळ
Chhagan Bhujbal : विद्देची देवता सरस्वती पण तिला शिकू दिले नाही, लक्ष्मी आहे पण महिलांच्या हातात पैसे जाणार नाहीत : छगन भुजबळ
Chhagan Bhujbal, Nashik : "भारत आणि इतर देश मागासले म्हणून ओळखले जात होते. इतर देशात महिला सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. महिलांना घरी बसवले 50 टक्के लोकसंख्या घरी बसली. विद्येची देवता सरस्वती पण तिला शिकू दिले नाही. लक्ष्मी आहे पण महिलांच्या हातात पैसे जाणार नाही याची काळजी घेतली", असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक पणती दारासमोर लावा. सावित्रीबाई फुलेंसारखे कपाळाला कुंकू लावावे असा मेसेज मला पाठवला. हा कार्यक्रम इथून पुढे दरवर्षी इथे करावा लागणार आहे. आपल्या शाळेतील मुलामुलींना इथे दर्शनासाठी घेऊन या, इथे जी चित्रफित आता दाखवली. हे उद्या दिवसभर दाखवा. शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी हे दोन पुस्तके प्रत्येकाने वाचा. प्लेगची साथ आली त्यात सावित्रीबाई फुले यांनी काम केले. सावित्रीबाईंना प्लेग झाला त्यात त्यांचा मृत्यू झाला. माहिती असूनही लोकांचे जीव वाचवले प्राणाचे बलिदान दिले.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ भाषणातील प्रमुख मुद्दे
- मुली शिकत आहेत , निवडणुका लढत आहेत
- महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता तो ५० वर्षापूर्वी सुरू झालं
- एक लव्य यांनी द्रोणाचार्य यानीची मूर्ती बनून शिकले
- महात्मा ज्योतिबा फुले ,सावित्री बाई फुले यांनी आपल्यासाठी काय केले आणि आपण काय करत आहोत
- महात्मा फुले हे मोठं उद्योजक होते खडकवासला धरण असे अनेक कामे त्यांनी केलं
- दागिने बनवण्याचे साचे त्याची एजन्सी होती
- महात्मा फुले यांनी सगळया देशात लोक गरीब आहेत त्यांना कृषी शिक्षण द्या , तांत्रिक शिक्षण द्या , पाणी व्यवस्थापन
- ज्योतिबा फुले गेले नंतर सावित्रीबाई काम केलं
- ग्रामीण वृतमान पत्र काढले
- १५० वर्षापूर्वी अमेरिकेत युद्ध सुरू होते काळे विरुद्ध गोरे
- आशिया खंडात असे काम करणारे पाहिले व्यक्ती
- बराक ओबामा यांना ते पुस्तक दाखवेल त्यांच्या डोळ्यात पाणी आले
- सगळ्या क्षेत्रात महिलापुढे
- विद्येचे देवता सरस्वती पण महिला शिक्षण द्यायचं नाही याची काळजी आम्ही घेतो
- लक्ष्मी पण हातात पैसे येणार नाही याची काळजी आम्ही घेतो
- शौर्यची देवता भवानी माता कुठेही महिलांना युद्धात घेत नाही
- जगात महिला सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने लढतात
- दर वर्षी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी करावा लागणार
- नायगाव येथे मुख्यमंत्री अनेक जन तिथे आहे मी जात आहे
- सावित्रीबाई फुले यांची चित्र्फित उद्या रात्रीपर्यंत दाखवा ज्यांना सावित्री बाई माहित नाही त्यांना माहीत होईल
- ,गुलाम गिरी, शेतकऱ्यांचा आसूड हे दोन पुस्तके वाचा भुजबळ यांचे आवाहन
इतर महत्त्वाच्या बातम्या