(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नांदेडमध्ये 15 दिवसात खाकीवर तिसरा डाग; भोकरचा पोलीस 'एसीबी'च्या जाळ्यात
Nanded : नांदेड जिल्ह्यातील भोकर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यास 25 हजार रुपयाची लाच स्किारताना अटक केलेय.
Nanded Latest Marathi News : नांदेड जिल्ह्यातील भोकर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यास 25 हजार रुपयाची लाच स्किारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. नांदेडमध्ये मागील पंधरा दिवसात लाच घेताना तिसऱ्या पोलीस कर्मचारी चतुर्भुज झाला आले.
पोलीस हे जनतेच्या सुरक्षेसाठी असते, मात्र हेच पोलीस आता लाच स्वीकारण्यात अव्वल ठरत असून महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारण्यात मागे टाकतील अशा घटना आता घडताना दिसत आहेत. मागील पंधरा दिवसात तीन लाचखोर पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. आठच दिवसापुर्वी शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याचा एक कर्मचारी लाच स्विकारताना पकडला. त्यानंतर काल सोमवारी किनवट येथील एक पोलीस कर्मचारी लाच स्विकारताना जेरबंद झाला. आज भोकर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ अडकला आहे.
भोकर पोलीस ठाण्यातील सुभाष लोभाजी कदम, वय 56 या पोलीस कर्मचाऱ्याने यातील तक्रारदार यांच्या बहिणीचे व शेजाऱ्यांचे भांडण झाले होते. भांडणानंतर तक्रारदार यांच्या बहिणीने आणि समोरील पार्टीने एकमेकांविरुध्द पोलीस स्टेशन भोकर येथे परस्पर तक्रारी दिल्या होत्या. तक्रारदार यांच्या बहिणीस मार लागला असुन सुध्दा त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन भोकर येथे गुन्हा दाखल न करता फक्त एन.सी.नोंदवून घेतली होती. त्याविरोधात तक्रारदार यांच्या बहिणीने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना भेटून गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. त्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सदर प्रकरणात फेर चौकशीचे आदेश दिले होते. त्यावरून समोरील पार्टीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला परंतु तक्रारीत दिलेल्या सर्व आरोपीविरुध्द गुन्हा दाखल न करता फक्त चार पुरुष आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
समोरील पार्टीचे तक्रारीवरून दाखल एन.सी.चे तपासात आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांची बहिण व नातेवाईक यांच्या विरुध्द दाखल एन.सी.मध्ये मदत करतो आणि तक्रारदार यांच्या बहिणीचे फिर्याद वरून दाखल गुन्ह्यातसुध्दा मदत करतो म्हणुन आरोपी लोकसेवक यांनी 25 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि.21 रोजी सापळा रचून सदर पोलीस कर्मचाऱ्यास 25 हजाराची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.मात्र पोलिसांच्या या प्रतापामुळे गेल्या काही दिवसात खाकीवरील डाग अधिक गडद होत चालले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील पोलीस दलातील लाचखोरीस आळा घालून खाकीची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.