एक्स्प्लोर

गावबंदी असतानाही ताफा गावात, खासदार प्रताप पाटलांच्या गाड्यांची तोडफोड; गावात पोलिसांचा बंदोबस्त

Maratha Reservation : खासदारांसह त्यांच्यासोबत असलेल्या वाहनांची देखील यावेळी तोडफोड करण्यात आलीय. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही.

नांदेड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गांवबंदी असतानाही गावात आलेल्या खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांच्या ताफ्यातील वाहनांची रात्री तोडफोड करण्यात आली आहे. नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात रात्री उशिरा ही घटना समोर आली आहे. तसेच, खासदारांसह त्यांच्यासोबत असलेल्या वाहनांची देखील यावेळी तोडफोड करण्यात आलीय. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. खासदारांच्या सोबत असलेल्या पोलिसांनी तणाव निवळण्यासाठी तातडीने प्रयत्न केले, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र तोडफोडीत तीन वाहनांचे मोठे नुकसान झालेय.

मराठा आरक्षणाचा मुद्दा गावागावात तापला असून, अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील अंबुलगा गावातील गावकऱ्यांनी देखील मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र असे असतांना खासदार प्रताप पाटील चिखलीकर रात्री गावात पोहचले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना अडवले. त्यानंतर खासदारांसह त्यांच्यासोबत असलेल्या वाहनांची यावेळी तोडफोड करण्यात आलीय.या तोडफोडीत तीन वाहनांचे मोठे नुकसान झालेय. 

गावकऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळले...

नांदेडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाला मोठा पाठींबा मिळताना पाहायला मिळत आहे. अनेक गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील गोळेगांव इथल्या ग्रामस्थांनी आज सकाळीच रस्त्यावर उतरत आरक्षणाची मागणी करत आंदोलन केले. गावकऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळत पुढाऱ्यांना गांवबंदी करत असल्याचे बॅनर लावले आहे. यावेळी एकत्रित आलेल्या गावकऱ्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत लक्ष वेधून घेतलंय. दुसरीकडे रात्री खासदारांच्या ताफ्यातील वाहनाची तोडफोड झाल्यानंतर सकाळ पासूनच गावागावात मराठा आरक्षण आंदोलनाचे लोण पोहोचलेले दिसत आहे. या आंदोलनामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून,  शांतता प्रस्थापित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. 

निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापतांना पाहायला मिळत आहे. तर, सात गावातील मराठा समाज बांधवांनी सर्व पक्षीय नेत्यांना सरसकट गावबंदी व आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर, 25 व 26 ऑक्टोबर रोजी तहसिलदार राजेश जाधव यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबतचे निवेदन पाठविण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

मोठी बातमी! शिंदे समितीला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; आणखी दोन महिने आरक्षण मिळणे अवघड?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ते इतक्या विश्वासाने सांगताय जसं काही ते प्रत्यक्ष साक्षीदारच होते; राहुल गांधींच्या गंभीर आरोपानंतर भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
राहुल गांधींच्या गंभीर आरोपांना सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, देवाचे अक्षरशः आभारच मानले पाहिजे, कारण....
एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही...; देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त, आ. नरेंद्र पाटीलही बोलले
एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही...; देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त, आ. नरेंद्र पाटीलही बोलले
Pooja Khedkar : फक्त युपीएससी नव्हे, तर समाजाची फसवणूक! बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तगडा झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
फक्त युपीएससी नव्हे, तर समाजाची फसवणूक! बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तगडा झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
Dada Bhuse : ...जेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे अचानक शाळेत येतात, विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसतात, शिक्षकांना बोलतात; पाहा PHOTOS
...जेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे अचानक शाळेत येतात, विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसतात, शिक्षकांना बोलतात; पाहा PHOTOS
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi in Parbhani : सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली, राहुल गांधींचा थेट आरोपSomnath Suryavanshi Family :सोमनाथने दगड मारल्याचे पुरावे द्या! सुर्यवंशी कुटुंबाचं फडणवीसांनाआव्हानNitin Gadkari on Nagpur :  नितीन गडकरींनी नागपुरकरांची माफी का मागितली ?Ajit Pawar Full PC : तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न ; आम्ही सोडवू, अजित पवार भुजबळावर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ते इतक्या विश्वासाने सांगताय जसं काही ते प्रत्यक्ष साक्षीदारच होते; राहुल गांधींच्या गंभीर आरोपानंतर भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
राहुल गांधींच्या गंभीर आरोपांना सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, देवाचे अक्षरशः आभारच मानले पाहिजे, कारण....
एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही...; देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त, आ. नरेंद्र पाटीलही बोलले
एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही...; देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त, आ. नरेंद्र पाटीलही बोलले
Pooja Khedkar : फक्त युपीएससी नव्हे, तर समाजाची फसवणूक! बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तगडा झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
फक्त युपीएससी नव्हे, तर समाजाची फसवणूक! बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तगडा झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
Dada Bhuse : ...जेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे अचानक शाळेत येतात, विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसतात, शिक्षकांना बोलतात; पाहा PHOTOS
...जेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे अचानक शाळेत येतात, विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसतात, शिक्षकांना बोलतात; पाहा PHOTOS
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट बीडमध्ये, नवनीत कॉवत यांच्याशी चर्चा; 28 डिसेंबरची डेडलाईन
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट बीडमध्ये, नवनीत कॉवत यांच्याशी चर्चा; 28 डिसेंबरची डेडलाईन
Nitin Gadkari : विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामात दिरंगाई, गडकरी गरजले! अधिकाऱ्यांना अल्टिमेटम, जनतेची माफी
विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामात दिरंगाई, गडकरी गरजले! अधिकाऱ्यांना अल्टिमेटम, जनतेची माफी
मुलांमधील किडनी विकारास प्रतिबंध कसा कराल, लक्षणे कोणती? तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोलाचा सल्ला
मुलांमधील किडनी विकारास प्रतिबंध कसा कराल, लक्षणे कोणती? तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोलाचा सल्ला
Mohammed Shami and Sania Mirza : मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या दुबईमधील फोटोनी भूवया उंचावल्या; त्या फोटोंमागील सत्य काय?
मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या दुबईमधील फोटोनी भूवया उंचावल्या; त्या फोटोंमागील सत्य काय?
Embed widget