एक्स्प्लोर

Nagpur Sports : राष्ट्रीय क्रीडा दिनी विविध स्पर्धा, शुक्रवारपर्यंत करा अर्ज

महाराष्ट्र राज्य ॲथेलेटिक्स स्पर्धेत नयन सरडेने 18 वर्षाखालील मुलांच्या हर्डल स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला तर प्रेम धनरे व राहुल कुमार यांनी धावण्याच्या स्पर्धेत संघाला द्वितीय स्थान मिळवून दिले.

नागपूर :  मेजर ज्ञानचंद यांचे स्मृती प्रित्यर्थ तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या क्रीडा दिनानिमित्त हॅन्डबॉल (पुरुष गट), फुटबॉल (12 वर्षाखालील बालगट), हॉकी (17 वर्षाखील मुले) व मैदानी (12 वर्षाखालील बालगट) अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हॅन्डबॉल, फुटबॉल व मैदानी स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल येथे तर हॉकी स्पर्धा पत्रकार निवासा जवळील विदर्भ हॉकी संघटनेच्या क्रीडांगणात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा 29 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता पासून सुरु होणार आहे.  स्पर्धेचे प्रवेश अर्ज 26 ऑगस्ट 2022 पर्यंत सकाळी 6.00 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर येथे सादर करावे. जिल्ह्यातील सबंधिम खेळाचा संघ, खेळाडू विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे.

ST Smart Card : एसटीच्या 'स्मार्ट कार्ड' योजनेला आणखी दोन महिने मुदतवाढ

क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंची ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड

नागपूर : मुंबई येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य ॲथेलेटिक्स स्पर्धेत नयन सरडे याने 18 वर्षाखालील मुलांची 110 हर्डल स्पर्धा 14.64 सेकंदात पूर्ण करून दुसरा क्रमांक पटकावला तर प्रेम धनरे व राहुल कुमार यांनी अनुक्रमे 300 व 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत मिडिल रिलेमध्ये संघाला द्वितीय स्थान मिळवून दिले. रायपूर येथे 9 ते 11 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या 33 व्या ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी नयन सरडे याची निवड झाली आहे. नागपूर विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक तथा क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य शेखर पाटील, नागपूरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, जिल्हा ॲथेलेटिक असोसिएशनचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. हे तीनही खेळाडू क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या क्रीडा प्रबोधिनी स्पोर्ट्स होस्टेलचे असून क्रीडा प्रबोधिनी नागपूरच्या क्रीडा मार्गदर्शिका अरुणा गंधे व क्रीडा  प्रबोधिनीचे माजी खेळाडू गजानन ठाकरे, शमशेर खान त्यांचे मार्गदर्शक आहेत.

Olympiad Exam : ऑलिम्पियाड परीक्षा 15 सप्टेंबर पासून, नागपुरातील एक लाखांवर विद्यार्थी होणार सहभागी

 

महत्त्वाच्या बातम्या

High Court: High Court: फटाकेबंदीच्या अंमलबजावणीबाबत पोलीस गंभीर नाही; उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचं निरीक्षण; 15 दिवसांच्या कारवाईचा तपशीलही मागवला
High Court: फटाकेबंदीच्या अंमलबजावणीबाबत पोलीस गंभीर नाही; उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचं निरीक्षण; 15 दिवसांच्या कारवाईचा तपशीलही मागवला
Anil Deshmukh: 100 कोटी रुपयांच्या कथित आरोपांवर बोट, अनिल देशमुख यांचं राज्यपालांना स्मरणपत्र; न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनीक करण्याची मागणी
100 कोटी रुपयांच्या कथित आरोपांवर बोट, अनिल देशमुख यांचं राज्यपालांना स्मरणपत्र; न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनीक करण्याची मागणी
Nagpur Politics : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच भाजपमध्ये गटबाजी? नागपूर पदवीधर निवडणुकीतील पराभवानंतर भाजप नेत्याचं स्फोटक विश्लेषण; पराभवामागचं राज'कारण' सांगितलं
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच भाजपमध्ये गटबाजी? नागपूर पदवीधर निवडणुकीतील पराभवानंतर भाजप नेत्याचं स्फोटक विश्लेषण; पराभवामागचं राज'कारण' सांगितलं
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde Shivsena: महायुतीतील कलगीतुऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला; दुष्काळी भागात मदतीसाठी कामाला लागण्याच्या सूचना
महायुतीतील कलगीतुऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला; दुष्काळी भागात मदतीसाठी कामाला लागण्याच्या सूचना
Pune Crime News : मुलाला माझी आठवण येत राहिली असती, म्हणून त्यालाही सोबत नेतेय; पुण्यातील विवाहितेने आयुष्य संपवण्याचं कारण चिठ्ठीत लिहिलेलं, मुलासह 18 व्या मजल्यावर गेली अन्...
मुलाला माझी आठवण येत राहिली असती, म्हणून त्यालाही सोबत नेतेय; पुण्यातील विवाहितेने आयुष्य संपवण्याचं कारण चिठ्ठीत लिहिलेलं, मुलासह 18 व्या मजल्यावर गेली अन्...
Rohit Pawar Ujani Dam: पाणी अन् वीज खाणारा, गुजरातने नाकारलेला प्रकल्प नकोच; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा
पाणी अन् वीज खाणारा, गुजरातने नाकारलेला प्रकल्प नकोच; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा
RBI Polymer Notes: आरबीआय 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनात कधीपासून आणणार? मोठी अपडेट समोर 
आरबीआय 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनात कधीपासून आणणार? मोठी अपडेट समोर 
पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; आठ जण जखमी, तीन महिलांचा समावेश, आमदारांनी दिली माहिती
पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; आठ जण जखमी, तीन महिलांचा समावेश, आमदारांनी दिली माहिती
Bhiwandi News: भिवंडीतील खावडा वीज प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्या; सुमित बाळ्या मामा म्हात्रे यांची मागणी
भिवंडीतील खावडा वीज प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्या; सुमित बाळ्या मामा म्हात्रे यांची मागणी
Marathi Actor Aabhijeet Kelkar Facebook Post: मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, 'माझ्या जीवाला धोका...' ; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत
मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, 'माझ्या जीवाला धोका...' ; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत
मला तुम्हाला भेटायचंय, काही गोष्टी दाखवायच्यात; राम पूर्णेकरांचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली
मला तुम्हाला भेटायचंय, काही गोष्टी दाखवायच्यात; राम पूर्णेकरांचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली
Embed widget