ST Smart Card : एसटीच्या 'स्मार्ट कार्ड' योजनेला आणखी दोन महिने मुदतवाढ
गणेशोत्सव तसेच दिवाळीच्या कालावधीत सवलतधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी मुदतवाढीच्या मागणीच्या अनुषंगाने 'स्मार्ट कार्ड' योजनेला नोंदणीकरण व वितरणासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई: एसटीच्या प्रवासात विविध घटकांतील सवलत धारकांना स्मार्टकार्ड बंधनकारक केले आहे. मात्र, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव तसेच दिवाळीच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांची तसेच इतर सवलतधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी नागरिकांच्या मुदतवाढीच्या मागणीच्या अनुषंगाने 'स्मार्ट कार्ड' योजनेला नोंदणीकरण व वितरणासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
29 विविध सामाजिक घटकांना सवलत
महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 29 विविध सामाजिक घटकांना 25 टक्क्यांपासून 100 टक्केपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत दिली जात आहे. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेली 'स्मार्ट कार्ड' काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्डासाठी नोंदणी करणे किंवा स्मार्टकार्ड घेणे शक्य झाले नाही. जुलैमध्ये आषाढी एकादशी निमित्त ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या मागणीनुसार या योजनेला 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
म्हणून वाढविली मुदत
पुढील आठवड्यात 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान असलेला गणेशोत्सव तसेच दिवाळीच्या कालावधीतही ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मुदतवाढीच्या मागणीच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्टकार्ड नोंदणीकरण व वितरण करणेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे कळविण्यात आले आहे.
मिळते 25 ते 100 टक्के सवलत
राज्य सरकार विविध प्रकारच्या सवलती देण्याचा एकोणतीस योजना राबवत आहे. तर विविध सामाजिक घटकांना सुमारे 25 ते 100% पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलती दिल्या जाते. या सवलतीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांना आधार कार्ड क्रमांकाची निगडित असलेल्या स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटी महामंडळाने सुरु केली होती. एसटी महामंडळाच्या प्रत्येक आगारांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी व अन्य म्हणजेच इतर सवलती धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या