Nagpur : पारडी- दिघोरी मार्गावर धावणार ट्रॉली बस, डीपीआर तयार करण्याचे काम महामेट्रोकडे
रबर टायर्सवर चालणारी ही ट्राली बस असून युरोपातील अनेक शहरांमध्ये प्रसिध्द आहे. आर्थिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. इलेक्ट्रिक ट्रॉली बसचे तिकीट तुलनेत 25 टक्के कमी राहणार आहे.
![Nagpur : पारडी- दिघोरी मार्गावर धावणार ट्रॉली बस, डीपीआर तयार करण्याचे काम महामेट्रोकडे Trolley bus to run on Pardi Dighori route task of preparing DPR to Maha metro Nagpur : पारडी- दिघोरी मार्गावर धावणार ट्रॉली बस, डीपीआर तयार करण्याचे काम महामेट्रोकडे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/18/77f6b61d77dd7d77b65273efebc3d69c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूरः केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पायलट प्रकल्पांतर्गत नागपुरातील पारडी व दिघोरी या 2 मार्गावर आता इलेक्ट्रिक ट्रॉली बस चालवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी महामेट्रोकडे डीपीआर तयार करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. डीपीआरला मंजूरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कामास सुरुवात होणार आहे. एका इलेक्ट्रिक ट्रॉली बसची किंमत सुमारे 50 लाख रुपये असून केंद्र सरकारच्या निधीतून हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.
Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर, तुमच्या शहरांतील किमती काय?
मेट्रोपेक्षा कमी खर्च
नागपुरातील ट्रॉली बसच्या दोन मार्गात प्रामुख्याने पारडी, दिघोरी चौक असून यात छत्रपती चौक, हिंगणा टी पॉइंट, वाडी आणि अंबाझरी आयुध कारखाना, वाडी, सीताबर्डी मार्ग जोडल्या जाणार आहे. इलेक्ट्रिक ट्रॉली बसचा खर्च हा मेट्रोपेक्षा कमी असल्याने हा प्रकल्प वेगाने पूर्णत्वास आणण्याचा मानस आहे. या ट्रॉली बसमध्ये 2 एसी कोच राहणार असून ओव्हरहेड इलेक्ट्रिक प्रणालीवर ट्राली बस चालविल्या जाणार आहे. रबर टायर्सवर चालणारी ही ट्राली बस असून युरोपातील अनेक शहरांमध्ये प्रसिध्द आहे. आरामदायक अशी वाहतूक व्यवस्था असल्याने आर्थिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. इलेक्ट्रिक ट्रॉली बसचे तिकीट तुलनेत 25 टक्के कमी राहणार आहे.
उद्यापासून निवडणूक आयोगात ठाकरे विरुद्ध शिंदे लढाईचा नवा अंक; अशी आहे ठाकरे गटाची रणनीती
ट्रॉलीबसबद्दल इतर माहिती
- 20 एप्रिल,1882 सर्वप्रथम युरोपात ट्रॉली बस धावली
- रेल्वे ट्रॅकशिवाय विजेच्या स्पर्शाने रस्त्यांवर धावणारी बस
- 43 देशांत ट्रॉली बस सुरू
- चढण्यासाठी सोयीची
- धावण्यासोबतच वीजनिर्मिती
- ट्रॉली बसमुळे ध्वनिप्रदूषण टाळते
- दुरुस्ती व देखभाल खर्च अत्यल्प
- कमी जागेत ट्रॉलीबस धावते
SSLV D1-EOS-2 Launched : इसरोकडून 'बेबी रॉकेट' लाँच, 750 विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'आझादी सॅट'चंही प्रक्षेपण, काय आहे खासियत?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)