SSLV D1-EOS-2 Launched : इसरोकडून 'बेबी रॉकेट' लाँच, 750 विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'आझादी सॅट'चंही प्रक्षेपण, काय आहे खासियत?
SSLV D1-EOS-2 Launched : इसरो (ISRO) नवी भरारी घेण्यास सज्ज झालं आहे. भारत सर्वात छोटं प्रक्षेपण यान (Launch Vehicle) लाँच करणार आहे.
SSLV D1-EOS-2 Launched : भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इसरोनं (ISRO) देशवासीयांना मोठं गिफ्ट दिलंय. इस्रोच्या 'बेबी रॉकेट'नं अर्थात एसएसएलवी-D1 नं (SSLV-D1) ईओएस-02 (EOS-02) आणि आझादी सॅट या उपग्रहांचं अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केलंय. 500 किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोनं SSLV अर्थात स्मॉल सॅटेलाईट लाँच व्हेईकलची निर्मिती केलीय. इस्रोच्या नव्या रॉकेटची उंची 34 मीटर, व्यास 2 मीटर आणि वजन 120 टन इतके आहे. 10 ते 500 किलो वजनाच्या उपग्रहांना जमिनीपासून 500 किमी उंचीवरील कक्षेत पाठवण्याची क्षमता एसएसएलव्ही रॉकेटकडे आहे. फक्त एका आठवड्याच्या कालावधीत, कमी मनुष्यबळाच्या साह्याने या रॉकेटची जोडणी शक्य आहे. त्यामुळे रॉकेटच्या उड्डाणाचा खर्चही कमी होणार असून, कमी वजनाच्या उपग्रहांसाठी जगभरातील कंपन्यांना प्रक्षेपणासाठी स्वस्त पर्याय उपलब्ध झालाय.
इसरो (ISRO) नवी भरारी घेतली आहे. भारतानं 'बेबी रॉकेट' म्हणजेच सर्वात छोटं प्रक्षेपण यान (Launch Vehicle) लाँच केलं आहे. इसरोनं सर्वात पहिलं 'स्माल सॅटेलाइट लाँच व्हेइकल' लाँच केलं आहे. या मिशनला इसरोनं SSLV-D1/EOS-02 असं नाव देण्यात आलं आहे. राकेट एसएसएलवी-D1 (SSLV-D1) रॉकेट श्रीहरिकोटा (Sriharikota) येथून सकाळी 9.18 वाजता लाँच झालं आहे. या प्रक्षेपणाला रविवारी मध्यरात्री 02.26 वाजेपासून सुरुवात झाली.
या प्रक्षेपण यानाची क्षमता 500 किलोहून अधिक आहे. एसएसएलवी-D1 प्रक्षेपण यान 'पृथ्वी निरीक्षण उपग्रह-02' (EOS-02) घेऊन निघालं आहे. 'माइक्रोसॅटेलाइट-2 ए' ('Microsatellite-2A') या उपग्रहाचं नाव बदलून 'पृथ्वी निरीक्षण उपग्रह-02' (EOS-02) असं ठेवण्यात आलं. या उपग्रहाचं वजन 142 किलो आहे. यासोबतच विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आझादी सॅटेलाईटचंही प्रक्षेपण करण्यात आलं आहे. 750 विद्यार्थ्यांनी आझादी सॅटेलाईट तयार केलं आहे.
SSLV-D1/EOS-02 Mission: Maiden flight of SSLV is completed. All stages performed as expected. Data loss is observed during the terminal stage. It is being analysed. Will be updated soon.
— ISRO (@isro) August 7, 2022
काय आहे मिशनची खासियत?
SSLV-D1 देशातील पहिले छोटे उपग्रह प्रक्षेपण यां आहे. पूर्वी, लहान उपग्रह सूर्य समकालिक कक्षासाठी पीएसएलव्हीवर (PSLV) अवलंबून होते, तर मोठ्या मोहिमांमध्ये जिओसिंक्रोनस ऑर्बिटसाठी जीएसएलव्ही (GSLV) आणि जीएसएलव्ही मार्क 3 (GSLV Mark 3) वापरला जात असे. पीएसएलव्ही लाँच पॅडवर आणण्यासाठी आणि असेंबल करण्यासाठी दोन ते तीन महिने लागतात, परंतु एसएसएलव्ही केवळ 24 ते 72 तासांत असेंबल करता येतं. SSLV अशा प्रकारे डिझाइन केलं आहे की ते कधीही आणि कोठेही लाँच केलं जाऊ शकते, मग ते ट्रॅकच्या मागे लोड होत असेल किंवा मोबाइल लाँच व्हेइकल किंवा कोणत्याही तयार केलेल्या लाँच पॅडवर लाँच केले जाईल.
दोन उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे.
EOS-02 उपग्रहाचं वैशिष्ट्य
एसएसएलवी-D1 प्रक्षेपण यानाच्या साहाय्याने 'पृथ्वी निरीक्षण उपग्रह-02' (EOS-02) या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. हा उपग्रह नवीन तंत्रज्ञान आणि इन्फ्रारेड कॅमेराने सुसज्ज आहे. EOS-02 हा या मोहिमेचा प्राथमिक उपग्रह आहे. हा उपग्रह नवीन तंत्रज्ञान आणि इन्फ्रारेड कॅमेराने सुसज्ज असून यामध्ये मॅपिंग, फॉरेस्ट्री, कृषी, भूविज्ञान आणि जलविज्ञान या क्षेत्रात संशोधन करेल. याशिवाय त्याचा उपयोग संरक्षणासाठीही केला जाणार आहे.
'आझादी सॅट' उपग्रहाचंही प्रक्षेपण
आझादी सॅट हा या मिशनमधील दुसरा उपग्रह आहे. हा उपग्रह ईओएस 02 च्या विभक्त झाल्यानंतर त्याच्या कक्षेत ठेवला जाईल. विशेष म्हणजे 'आझादी सॅट' हा उपग्रह 750 विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वैज्ञानिकांच्या देखरेखीखाली तयार केलेल्या 'आझादी सॅट' उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. हे विद्यार्थी स्पेस किड्स इंडियाशी संबंधित आहेत.