एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

बुद्धाचे तत्वज्ञान विश्वकल्याणाचे, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ; लाखो बौद्ध अनुयायांच्या उपस्थिती 66 वा धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा

पंतप्रधान मोदी यांनी 2400 हजार कोटींची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिली. एक रुपया घेतला नाही. तिथे काम ही सुरू झाले असून 2024 पर्यंत स्मारक पूर्ण करण्यात येईल.

Nagpur DeekshaBhoomi Updates: बुद्धाचे तत्वज्ञान विश्वकल्याणाचे आहे. बुद्धाने दिलेले पंचशीलाचे तत्त्व जगाच्या कल्याणाचं आहे. हाच समता आणि बंधुतेचा आधार आहे. हाच धम्म स्वीकारून बाबासाहेबांनी या देशातील जनतेला सामाजिक, आर्थिक दृष्टीने न्याय मिळवून दिला. बाबासाहेबांच्या कार्याची तुलना जगातील अमेरिकेतली मार्टिन ल्यूथर किंगसोबतच होऊ शकते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले. पवित्र दीक्षाभूमीवर (Deeksha Bhoomi) बुधवारी 66 व्या धम्मप्रवर्तन दिनाच्या मुख्य समारोहात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. 

नितीन गडकरी म्हणाले, बाबासाहेबांनी (Babasaheb Ambedkar) सामाजिक बदल आणि शैक्षणिक विकास यावर भर दिला होता. यामुळे मोठे परिवर्तन झाले. ही दीक्षाभूमी या परिवर्तनाचा केंद्रबिंदू असून आम्हा सर्वांची प्रेरणाभूमी आहे. बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करण्याची आज खरी गरज आहे. तसेच दीक्षाभूमीला अतिरिक्त जागा देण्याचा विषय आम्ही केंद्रीय स्तरावर मांडून त्यावर लवकर निर्णय घेऊ.

यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात तथागतांचा बुद्ध धम्म देऊन या देशातील जनतेला प्राचीन संस्कृतीशी जोडले. बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध धम्म हा वैश्विक धम्म आहे. त्याचे अनुभव देशविदेशात भेटी दिल्यानंतर प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी फडणवीसांनी दीक्षाभूमीच्या विकासाचा 190 कोटींचा आराखडा येत्या 15 दिवसांत मंजूर करु असा शब्द दिला. दीक्षाभूमी सध्या ब वर्ग पर्यटन केंद्र असून ते अ वर्ग करावे यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु असेही ते म्हणाले. 

2024 पर्यंत मुंबईतील चैत्यभूमीजवळील (Chaityabhoomi Dr. Babasaheb Ambedkar Smarak) इंदू मिल येथे भव्य स्मारक साकार होईल, मुंबईत (Mumbai) येणारा प्रत्येक जण ज्या 'सी लिंक'वरुन जातो. त्या सर्वांना या स्मारकाला नमन करुनच जावे लागेल. एवढे भव्य दिव्य असे हे स्मारक तयार होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जगातील सर्वोत्तम संविधान दिले. फक्त संविधानाने देशात समता प्रस्थापित झाली. सर्वांना संविधानाने संधीची समानता दिली असल्याने साऱ्यांच्या आकांक्षा पूर्ण होत आहेत. यामुळेच मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी दीक्षाभूमी विकासाचा आराखडा तयार केला. पहिल्या टप्प्यात 100 कोटीपैकी 40 कोटीचा निधी नागपूर सुधार प्रन्यासकडे वळता केला. प्रशासकीय मान्यता दिली. मात्र अडीच वर्षात हा निधी खर्च झाला नाही. आता नव्याने 190 कोटीचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला तत्काळ प्रशासकीय मान्यता मिळेल अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली जाईल.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कमलताई गवई होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, पोलिस आयुक्त डॉ. अमितेशकुमार, मा. म. येवले, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. मिलिंद माने, डॉ. सिद्धार्थ गायकवाड, महापालिकेचे आयुक्त राधाक्रिष्ण बी, सीमा रामदास आठवले, उपस्थित होते. प्रास्ताविक समितीचे राजेंद्र यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य एन. आर. सुटे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

दोन वर्षात इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची (Indu Mills) जागा मिळत नव्हती. पंतप्रधान मोदी यांनी 2400 हजार कोटींची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिली. एक रुपया घेतला नाही. तिथे काम ही सुरू झाले असून 2024 पर्यंत स्मारक पूर्ण करण्यात येईल. लंडनमध्ये ज्या निवासात बाबासाहेब राहिले ते घर सरकारने विकत घेतले. तेथे स्मारक उभाले.

पावसातही नतमस्तक होण्याची उर्जा कायम

एरव्ही लाखोंचा समुदाय अनुभवणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला पावसामुळे फटका बसला. ऐन कार्यक्रमाच्यावेळी पावसाने हजेरी लावल्याने मोकळ्या मैदानावर बसलेल्या लाखो अनुयायांना उठून आडोशाची मदत घ्यावी लागली. पाऊस थांबून थांबून येत असल्याने विचारपीठावरील कार्यक्रमही खंडित होत होता. सोबतच अतिथीही पावसामुळे उशिरा आले. त्यामुळे कार्यक्रम थोडा उशीराने सुरु झाला. तर दीक्षाभूमी परिसरातील अनुयायांनी गर्दी स्तूपातील बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी लांब रांगेत भिजत उभे होते.

इतर महत्तवाच्या बातम्या

Deekshabhoomi : दीक्षाभूमीवर पसरली निळाई.. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तीन वर्षानंतर उसळला भीमसागर

Deekshabhoomi : दीक्षाभूमीवर तीन वर्षानंतर उसळला भीमसागर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Embed widget