Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
Mumbai News : पत्र्यावर पडलेला बॉल काढण्यास गेलेल्या 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गोरेगाव येथे घडली आहे.
![Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू unfortunate death of 10 year old boy who went to pick up ball from iron shade Death from lightening shock incident in Goregaon Mumbai Maharashtra marathi news Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/ff7b09b3e2cafaa1fa3bc8c56a9e24671719772417283322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पत्र्यावर पडलेला बॉल काढायला गेलेल्या चिमुकल्यावर काळाने घाला घातला आहे. मुंबईतील या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पत्र्यावर पडलेला बॉल काढण्यासाठी गेलेल्या 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोरेगाव येथील ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
पत्र्यावर पडलेला बॉल काढणं जीवावर बेतलं
गोरेगाव पूर्वेकडील मीनाताई ठाकरे मैदानात आज दुपारी 3 च्या सुमारास क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या दहा वर्षाच्या चिमुकल्याचा म्हाडाकडून पोलिसांसाठी बांधलेल्या चौकीच्या छतावरील बॉल काढण्यासाठी गेलेल्या मुलाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
गोरेगाव पूर्वेकडील न्यू म्हाडा कॉलनी सर्कल येथील मीनाताई ठाकरे मैदानात 10 वर्षाचा चिमुकला क्रिकेट खेळत असताना त्याचा बॉल बंद असलेल्या पोलीस चौकीच्या पत्र्यावर पडल्यानंतर तो बॉल काढण्यासाठी पत्र्यावर चढला असता त्याला विजेचा शॉक लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने मीनाताई ठाकरे मैदानातील लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला
या घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मयत मुलाचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ट्रामा केअर रुग्णालयात पाठवला असून या प्रकरणी नेमकी चूक कोणाची आहे, याचा तपास दिंडोशी पोलीस करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)