(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात 30 नृत्य पथकांचा सहभाग
दिवासी पांरपारिक कांबड नृत्य पथक उडदावणे, जि. अहमदनगर यांच्या कांबड नृत्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले, व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक वीर बाबुराव शेडमाके घुसाडी नृत्य - 2 पथकाला मिळाले.
नागपूर : महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित जागतिक आदिवासी दिन व आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव तसेच गुणगौरव सोहळयाचा समारोप 14 ऑगस्ट रोजी पशुवैद्यकीय महाविद्यालय सेमिनरी हील नागपूर येथे झाला.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास विभाग नागपूरचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, सिनेट सदस्य दिनेश शेराम, समाजकल्याण विभागाचे सेवानिवृत्त सहआयुक्त एम. एम. आत्राम, व्ही.एन.आय.टी. नागपूरचे प्रा. डॉ. दिलीप लटये, समाज कल्याण विभाग भंडाराचे उपआयुक्त आर. डी. आत्राम, ऑफ्रोट संस्था नागपूरचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र मरसकोल्हे, अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नागपूरच्या सहआयुक्त तथा उपाध्यक्ष श्रीमती बबिता गिरी, ऑल इंडीया आदिवासी फेडरेशनचे केंद्रीय अध्यक्ष मधुकर उईके, आदिवासी विकास विभाग नागपुरचे प्रकल्प अधिकारी अशोक वाहणे, ऑफ्रोट संस्था नागपूरचे सल्लागार तथा सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त जी. एम साखरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
RBI : यूपीआय आणि क्रेडिट कार्ड शुल्कासंबंधी अभिप्राय द्या; आरबीआयचे नागरिकांना आवाहन
30 नृत्य पथक सहभागी
या कार्यक्रमात तीस नृत्य पथकांनी सहभाग घेतला. आदिवासी पांरपारिक कांबड नृत्य पथक उडदावणे, जि. अहमदनगर यांच्या कांबड नृत्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले, व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक वीर बाबुराव शेडमाके घुसाडी नृत्य - 2 पथक धानोरा, जि. यवतमाळ या पथकाच्या आदिवासी नृत्याने प्राप्त केले. एकलव्य आदिवासी सांस्कृतिक कलापथक डोल्हारे, जि. नाशिक या पथकांच्या आदिवासी नृत्याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. आदिवासी कन्सरी माता ढोलनृत्य पथक साखरशेत, जि. पालघर या पथकांच्या ढोलनृत्याने उत्तेजनार्थ बक्षीस पटकाविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी विकास विभाग नागपूरचे उपआयुक्त दशरथ कुळमेथे, संचालन कवडस शासकीय आश्रमशाळेतील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षिका शिल्पा खुळे व धनश्री परतेती आणि आभार प्रदर्शन आदिवासी विभाग नागपूरचे सहाय्यक आयुक्त (प्रशासन) नयन कांबळे यांनी केले.