महिला सक्षमीकरणसाठी विज्ञान नाही, तर महिलांच्या योगदानामुळे विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य
Indian Science Congress : नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात आज 108 व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे उद्घाटन पार पडले. यासाठी पंतप्रदान नरेंद्र मोदी आभासी पद्धतीने उपस्थित होते.
![महिला सक्षमीकरणसाठी विज्ञान नाही, तर महिलांच्या योगदानामुळे विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य research of Indian scientists will be a guide for the whole world Prime Ministers speaks at the inaugural function of the Indian Science Congress महिला सक्षमीकरणसाठी विज्ञान नाही, तर महिलांच्या योगदानामुळे विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/a92a3851c011dbc202843f0679c21d401672726244003440_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Indian Science Congress : "येणाऱ्या 25 वर्षात भारत जी जी मोठी झेप घेईल त्यात विज्ञान तंत्रज्ञानाचा वाटा महत्वाचा राहील, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. 108 व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात आज 108 व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे उद्घाटन पार पडले. यासाठी पंतप्रदान मोदी आभासी पद्धतीने उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह आणि रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
"21 व्या शतकात आपल्याकडे दोन गोष्टी मोलाच्या आहेत. यातील पहिली डेटा आणि दुसरी विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील आपली प्रगती. यंदाच्या विज्ञान काँग्रेससाठी विज्ञान तंत्रज्ञानद्वारे शाश्वत विकास आणि महिला सक्षमीकरण हे विषय केंद्रबिंदू ठेवण्यात आले आहे. सध्या देशात वातावरण असे आहे की फक्त महिला सक्षमीकरणसाठी विज्ञान नाही तर महिलांच्या योगदानामुळे विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास होत आहे. प्रयोग शाळेत होणारे संशोधन सामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्यांच्या विकासासाठी कामी आले पाहिजे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
"भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन जगभरासाठी मार्गदर्शक ठरत आहे. भारताने केलेल्या असाधारण कामांची चर्चा आज जगभरात आहे. भविष्यात भारतीय प्रयोगशाळेतील संशोधन जगाच्या गरजा पूर्ण करणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
विज्ञान क्षेत्रातही देशाची चांगली कामगिरी
पंतप्रधान म्हणाले, 'पीएचडी मिळवणाऱ्या संशोधकांमध्ये जगात टॉप तीनमध्ये आहे. तसेच स्टार्टअप मध्येही टॉप तीनमध्ये आहे. विज्ञानाच्या क्षेत्रातही देशाची गती झपाट्याने वाढली आहे. जगभरातील 130 देशांच्या यादीत 2015मध्ये 81 व्या क्रमांकावरुन आपल्या देशाने 2022मध्ये 40 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. शास्त्रज्ञांनी तरुणांना संशोधनासाठी प्रोत्साहीत करावे. त्यांच्यातील संशोधकाला व्यासपीठ मिळाला तर येत्या काही वर्षात देश जगाचे मार्गदर्शन करणार आहे, असा विश्वासही यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला.
महिलांच्या भागिदारीने विज्ञानाचे सक्षमीकरण
'आज महिला सर्व क्षेत्रात अग्रणी आहेत. विज्ञानाच्या मदतीने महिलांचे सक्षमीकरण करण्यापेक्षा महिलांच्या भागिदारीने विज्ञानाचे सक्षमीकरण करण्याकडे आपण वाटचाल करु', असेही पंतप्रधान म्हणाले. जी 20च्या अध्यक्षपदाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले, जी 20च्या प्रमुख विषयांमध्येही महिलांच्या विकासाच्या मुद्द्यावर प्राथमिकता देण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षात देशाने गवर्नेंससह अनेक असाधारण कार्य केले आहे. त्याची चर्चा जगभरात चर्चा असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले.
5000 महिला होणार सहभागी
आजपासून सुरू झालेली इंडियन सायन्स काँग्रेस 7 जानेवारीपर्यंत चालणार असून 5 आणि 6 जानेवारी रोजी महिलांसाठी विशेष ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये देशभरातील 5000 महिला सहभागी होणार आहेत.
ही बातमी देखील वाचा...
नवीन वर्षाची नागपूरकरांना भेट; लवकरच 'आम्ही नागपुरी'चा सेल्फी पॉईंट, क्लॉक टॉवरच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्णत्वाकडे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)