एक्स्प्लोर
Advertisement
सुखी जीवनाचा मार्ग म्हणजे भविष्याची कोणतीही चिंता न करणे : नितीन गडकरी
परमेश्वराने आपल्याला आधीच आपल्या औकात आणि हैसियत पेक्षा भरभरुन दिले आहे. त्यामुळे माझे काय होईल, मला काय मिळेल अशी चिंता करणारे आपली शांत झोप गमावून बसतात.
नागपूर : सुखी जीवनाचा एक मार्ग म्हणजे भविष्याची कोणतीही चिंता न करणे असा सल्ला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. मला काय मिळेल, माझे काय होईल याची काळजी न करता बिनधास्त जगणे हाच खरा सुखी जीवनाचा मार्ग असल्याचं नितीन गडकरी म्हणाले.
नागपुरात पंचांगकर्ते राजंदेकरकृत महाराष्ट्रीय पंचांग प्रकाशन सोहळ्याचं आयोजन केलं होतं, त्यात ते बोलत होते. माझा ज्योतिष शास्त्रावर विश्वास असला तरी मी माझी जन्मकुंडली कोणालाच कधीच दाखवत नाही. सुखी जीवन जगण्यासाठी भविष्याची चिंता सोडणे आवश्यक असते असे गडकरी म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा भविष्यशास्त्रावर विश्वास आहे?
परमेश्वराने आपल्याला आधीच आपल्या औकात आणि हैसियत पेक्षा भरभरुन दिले आहे. त्यामुळे माझे काय होईल, मला काय मिळेल अशी चिंता करणारे आपली शांत झोप गमावून बसतात. मला मात्र गाढ झोप लागते असे गडकरी म्हणाले. दरम्यान, त्यांचा हा सल्ला नेमका कोणासाठी होता हे त्यांच्या विधानातून स्पष्ट झाले नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement