Nagpur News: खळबळजनक! उड्डाण पुलासाठी खोदकाम करताना मजुरांना सापडला मानवी हाडांचा सांगाडा; पोलीस घटनास्थळी, तपास सुरू
Nagpur News: या मानवी सांगाड्यामुळे मजुरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. हे कंकाळ किती जुन आहे, महिलांचे आहे की पुरुषाचे आहे.

नागपूर: नागपुरात उड्डाण पुलासाठी निर्माणासाठी खोदकाम सुरू असताना मजुरांना मानवी कंकाळ (human skeleton) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नागपूरच्या (Nagpur News) सक्कदरा पोलीस स्टेशन अंतर्गत बेसा पावर हाऊस जवळ उड्डाण पुलासाठी हे खोदकाम सुरू आहे.काल (शुक्रवारी, ता 8) त्या ठिकाणी मजूर खोदकाम करत असताना मानवी सांगाडा (human skeleton) आढळून आला त्यानंतर लगेच पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
तसेच फॉरेन्सिकच्या पथकाचा माध्यमातून या सगळे कंकाळ फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या मानवी सांगाड्यामुळे मजुरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. हे कंकाळ किती जुन आहे, महिलांचे आहे की पुरुषाचे आहे. सगळ्या बाबतीत तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच कंकाळवरून मृतदेहाची ओळख (human skeleton) पटवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.























