एक्स्प्लोर
नागपूरमध्ये भाजपने हिंदी भाषिक उमेदवार द्यावा, बॅनरबाजीद्वारे मागणी
नागपूरच्या पश्चिमी टोकावरील वस्त्यांमध्ये काही लक्षवेधी बॅनर्स लावण्यात आले आहेत. भाजपच्या झेंड्याच्या रंगात असलेल्या या बॅनर्सवर 'पश्चिम नागपूर की यही पुकार... हिंदी भाषी अबकी बार' असा मजकूर छापण्यात आला आहे.
नागपूर : नागपूरच्या पश्चिमी टोकावरील वस्त्यांमध्ये काही लक्षवेधी बॅनर्स लावण्यात आले आहेत. भाजपच्या झेंड्याच्या रंगात असलेल्या या बॅनर्सवर 'पश्चिम नागपूर की यही पुकार... हिंदी भाषी अबकी बार' असा मजकूर छापण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम नागपूरमधून भाजपने हिंदी भाषिक उमेदवाराला संधी द्यावी अशी, मागणी या बॅनर्सद्वारे करण्यात आली आहे. हे बॅनर्स कोणी लावले आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
नागपूर शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. सर्व आमदार हे मराठी भाषिक आहेत. शहरात दीड लाखांपेक्षा जास्त हिंदी भाषिक मतदार असून बहुतांशी मतदारांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला सहकार्य केले होते. त्यामुळे आता भाजपने नागपुरात हिंदी भाषिक नेत्याला आमदार बनण्याची संधी द्यावी असा तर्क त्यामागे दिला जात आहे.
दरम्यान, हे बॅनर्स कोणी लावले? त्यामागे कोण आहेत? हे स्पष्ट झालेले नाही. बॅनर्सवर कोणत्याही संघटनेचे किंवा नेत्याचे नाव नाही. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांचे लक्ष हिंदी भाषिकांच्या या मागणीकडे वेधण्यासाठी काही भाजप कार्यकर्त्यांनीच ही युक्ती लढवल्याची चर्चा आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement