Moreshwar Temurde: विधानसभेचे माजी उपसभापती, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन, देह वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्याचा निर्णय
नुकतीच टेमुर्डेंनी काँग्रेसचे विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहून केली होती. या मागणीमुळे ते चर्चेत आले होते.
NCP Leader Moreshwar Temurde Paases Away: राष्ट्रवादी काँग्रेसचे (National Congress Party) ज्येष्ठ नेते चंद्रपूरमधील (Chandrapur) वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अॅड. मोरेश्वर टेमुर्डे (Moreshwar Temurde) यांचे 82 व्या वर्षी निधन झाले. वरोरा येथे राहत्या घरी झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. निधनाची बातमी कळताच राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मोरेश्वर टेमुर्डे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. राष्ट्रवादीत आणि राज्याच्या राजकारणात एकनिष्ठ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती होती.
कधीकाळी शेतकरी नेते शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेकडून वरोरा विधानसभा मतदार संघातून सलग दोन वेळा निवडणूक जिंकून आमदार झालेले ॲड. टेमुर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होताच शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सक्रिय होते. शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते. नुकतीच त्यांनी काँग्रेसचे विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहून केली होती. या मागणीमुळे ते चर्चेत आले होते.
अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, 1991 ते 1995 आणि 95 ते 2000 या काळात त्यांनी दोनवेळी वरोरा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले आहे. 1991 -95 या काळात विधानसभा उपाध्यक्ष होते. अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या उभारणीत होता मोठा वाटा होता. राजकारणात अत्यंत सक्रिय असलेले टेमुर्डे राजकिय स्थितीवर पोटतिडकीने भाष्य करत असते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी वरोरा येथील राहत्या घरी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या इच्छेनुसार मृतदेह चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला दान करण्यात येणार आहे.
त्यांचा पार्थिव मेडिकल कॉलेजला दान करण्याच्या निर्णय कुटुंबाने घेतला आहे. "माझ्या मृत्यूनंतर माझा देहाला अग्नी देवू नका, माझा देह मेडिकल कॉलेजला दान करा",असा संकल्प मोरेश्वर टेंभुर्डे यांनी केला होता. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबाने हा निर्णय घेतला आहे.
शरद पवार यांच्याकडूनही श्रद्धांजली
'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे दुःखद निधन झाले. जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या उभारणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.' असे ट्विट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :