एक्स्प्लोर
Advertisement
रामटेकमध्ये दोन कारमधून 80 लाखांची रोकड पकडली
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रोकड जप्त करत ती पुढील तपासासाठी आयकर विभागाला सोपविली आहे. ज्या ठिकाणी ही कारवाई झाली ते मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणारे मार्ग आहे.
नागपूर : रामटेक लोकसभा मतदार संघातील अंतर्गत सावनेर तालुक्यातील सातनूर केळवद या ठिकाणी दोन वाहनाच्या तपासणीत जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने एकूण 80 लाख रुपयांची रोकड पकडली.
एका कारमधून 30 लाख तर दुसऱ्या कार मधून 50 लाख अशी रोकड पकडली आहे. संबंधित वाहनचालक ही रोकड कुठे नेत होते याचे उत्तर अद्याप मिळू शकलेले नाही.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रोकड जप्त करत ती पुढील तपासासाठी आयकर विभागाला सोपविली आहे. ज्या ठिकाणी ही कारवाई झाली ते मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणारे मार्ग आहे..
काल देखील मध्यप्रदेशातून राज्यात येणाऱ्या आणखी एका मार्गावर 7 लाख 60 हजारांची रोकड पकडली होती. त्यामुळे मध्यप्रदेशातून नागपुरात हे पैसे कोण आणत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
राजकारण
बॉलीवूड
Advertisement