एक्स्प्लोर
रेलरोकोमुळे पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या 60 फेऱ्या रद्द
नव्या वेळापत्रकानुसार शनिवार आणि रविवारच्या काही गाड्या रद्द केल्याचा दावा करत नायगाव स्टेशनवर प्रवाशांनी आक्रमक पवित्र घेत रेलरोको केला.
वसई-विरार : नायगाव रेल्वे स्टेशनवरील रेलरोकोमुळे पश्चिम रेल्वे मार्गाच्या लोकलच्या 60 फेऱ्या रद्द करव्या लागल्या आहेत. पश्चिम रेल्वेने ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
https://twitter.com/WesternRly/status/916569313925939202
नव्या वेळापत्रकानुसार शनिवार आणि रविवारच्या काही गाड्या रद्द केल्याचा दावा करत नायगाव स्टेशनवर प्रवाशांनी आक्रमक पवित्र घेत रेलरोको केला. यामुळे चर्चगेटकडे येणारी पश्चिम रेल्वेची वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती.
तासाभराच्या खोळंब्यानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरु
तर या गोंधळातच लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या एका प्रवाशाला नाहक मार खावा लागाला. रेलरोकोमुळे एक तास लोकल आली नाही. परिणामी गर्दी झाली आणि या संतप्त प्रवाशांनी एका प्रवाशाला मारहाण केली आहे.
लोकल विरारवरुन भरुन येते, त्यामुळे नायगाव स्टेशनला प्रवाशांना चढता येत नाही. त्याचा राग लोकांनी दारात असलेल्या प्रवाशावर काढला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement