एक्स्प्लोर
बुलेटसाठी नवऱ्याचा तगादा, गर्भवतीची चिमुकलीसह रेल्वेखाली उडी
रेणुका यांचा पती पिंटू यादव हा हुंड्यासाठी रेणुका यांना प्रचंड त्रास देत होता. पिंटू यादव बुलेट गाडी मागत होता, असा आरोप रेणुका यांच्या वडिलांनी केला आहे.
भाईंदर (ठाणे) : भाईंदर रेल्वेस्थानकात गर्भवती महिलेने तीन वर्षांच्या चिमुरडीसह रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्येचा हा थरार रेल्वेच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. रेणुका सिंग यादव असे महिलेचं नाव आहे.
रेणुका सिंह यादव यांनी भाईंदर रेल्वे स्थानकावर रेल्वेखाली उडी घेत, स्वत:सोबत तिघांचं जीवन संपवलं आहे. शुक्रवारी रात्री 12.17 मिनिटांची ही घटना आहे.
आत्महत्या का केली?
रेणुका यांचा पती पिंटू यादव हा हुंड्यासाठी रेणुका यांना प्रचंड त्रास देत होता. पिंटू यादव बुलेट गाडी मागत होता, असा आरोप रेणुका यांच्या वडिलांनी केला आहे.
चारच वर्षांपूर्वी रेणुका आणि पिंटू यांचं उत्तर प्रदेशातील मूळ गावी लग्न झालं होतं. त्यांना तीन वर्षांची मुलगी सुद्धा होती. शिवाय रेणुका आता गर्भवती होती.
दरम्यान, आरोपी पती पिंटू यादव याला नवघर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरोधात हुंड्यासाठी त्रास दिल्याप्रकरणी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाईंदरमधील नवघर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पाहा बातमीचा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
करमणूक
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement