प्रेक्षकांनी भिकार मालिका पाहणं बंद करा ,आपली चॉईस तपासून पाहा : विक्रम गोखले
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी मालिकांचा घसरत चाललेल्या दर्जावरुन प्रेक्षकांना सल्ला दिला आहे. प्रेक्षकांनी स्वत:चा चॉईस तपासून पाहा असं ते म्हणाले.
कल्याण : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी मालिकांचा घसरत चाललेल्या दर्जावरुन प्रेक्षकांना सल्ला दिला आहे. गोखले यांनी म्हटलं आहे की, प्रेक्षकांनी स्वत:चा चॉईस तपासून पहा, निश्चित करा, त्याच्यावर बंधने घाला आणि भिकार सिरीयल पाहणे बंद करा, तुमचा वेळ वाया घालवू नका, तुम्ही पाहत नाही म्हटल्यावर ते तयार करणार नाहीत आणि चांगल्याच्या मागे लागतील. म्हणजे मग चांगले दिग्दर्शक, नट लेखक येतील म्हणूनच अंतर्मुख करणारा सिनेमा, नाटक, सिरीयल नक्की पहा असे आवाहन राज्यभरातील विक्रम गोखले यांनी केले. कल्याणात सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्रा. रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत दुसऱ्या पुष्पात ते बोलत होते.
रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत विक्रम गोखले यांनी प्रेक्षकाशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातीपासूनच प्रसार माध्यमाच्या बदलत्या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त केली. डिजीटायझेशनमुळे संवेदना, संवेदनशीलता या दोन गोष्टीतील अंतर वाढू लागले असून पैसे मिळविण्यासाठी काहीही प्रेक्षकाच्या माथी मारले जात आहे.
आज प्रसार माध्यमे पैशाच्या मागे धावत असल्याने चांगल्याचा त्यांना विसर पडल्याचे गोखले यांनी सांगितले. आज कोणताही अर्थ नसलेल्या सिरीयल घाल पाणी, घाल पीठ या न्यायाने प्रेक्षकाच्या माथी मारल्या जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
नागराज मंजुळेंचं केलं कौतुक
कोरोना काळाचे वर्णन करणारी शॉर्ट फिल्म वैकुंठ दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तयार केली असून ही अतिशय विदारक सत्यावर आधारित असून अशी कलाकृती निर्माण केल्याबद्दल गोखले यांनी त्यांचे कौतुक केले. सोबतच आपल्याला त्यांच्याबरोबर काम करायला आवडेल असे सांगितले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Budget 2022: अर्थसंकल्पाचं LIVE कव्हरेज कुठे, कधी पाहाल?
- Budget 2022 on App: इंग्रजी किंवा हिंदीत वाचू शकाल अर्थसंकल्प; केंद्र सरकारने लॉन्च केलं अॅप
- Budget 2022: अर्थसंकल्प 2022 पासून ऑटोमोबाईल क्षेत्राच्या अपेक्षा काय, गाडी घेणं स्वस्त होणार का?
- Budget 2022: पीएफमध्ये करमुक्त योगदानाची मर्यादा वाढणार?; अर्थमंत्र्यांच्या घोषणेकडे लक्ष
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha