एक्स्प्लोर

Kalyan Crime News: आधी व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमक्यांना घाबरून घरातलं सोनं दिलं; नंतर दोघी बहीणी घरातून पळून गेल्या, आई-वडिलांना लव जिहादचा संशय

Kalyan Crime News: दोन्ही सख्ख्या बहिणी अरबाज नावाच्या तरुणाच्या ताब्यात असल्याचा दावा आई वडिलांनी केला आहे.

कल्याण : कल्याणमधून दोन सख्या बहिणी गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. कल्याणमध्ये दोन सख्या बहिणींना प्रेमाच्या (Kalyan Crime News) जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ काढत त्यांना ब्लॅकमेल केलं असल्याचंही बोललं जात आहे. हा सर्व लव जिहादचा प्रकार असल्याचा संशय (Kalyan Crime News) व्यक्त केला जात आहे. दोन्ही सख्ख्या बहिणी अरबाज नावाच्या तरुणाच्या ताब्यात असल्याचा दावा आई वडिलांनी केला आहे. अरबाज नावाच्या मुस्लिम तरुणाने हिंदू मुलींशी मैत्री वाढवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडीओ काढत ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(Kalyan Crime News)

अरबाज या तरुणाच्या संपर्कात दोन्ही बहिणी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घरातून गायब झाल्यावर शेवटचा कॉल अरबाजला केला आहे. अरबाजच्या जाचाला कंटाळून मुलींनी कॉलेज बंद केले होते. आई वडिलांना शिक्षकांचे नाव सांगत वेगवेगळ्या फोन नंबरवरून संपर्क साधत तुमची मुलगी कॉलेजला आली नाही असे सांगत कॉलेजला बोलवत होता. दोघी मुली घरातून गायब झाल्याने आई वडिलांची चिंता वाढली आहे. आमच्या मुली आम्हाला द्या अशी याचना आई वडिलांनी केली आहे.(Kalyan Crime News) 

सामाजिक कार्यकर्ते दुर्गेश बागुल यांनी हा लव जिहाद असल्याचा दावा केला आहे. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केले जात असल्याचा आरोप केला आहे. बागुल यांच्या मदतीने मुलींचे आई वडील पोलिसांपर्यंत पोहोचले आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाण्या मिसिंगची तक्रार दाखल केली. आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करत आमच्या मुली आम्हाला द्या अशी याचना केली आहे. 

गायब झालेल्या मुलींच्या तक्रारी संबंधी पोलिसांकडे चौकशी केली असता पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली नसून त्या मुली पळून गेल्या आहेत, असे उत्तर देत मिसिंग दाखल केली असल्याचे सांगितले तर संशयित तरुणाची चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली. 

आईने सांगितलं नेमकं काय घडलं?

आईने रडत रडत सांगितलं की, माझ्या दोन्ही मुली अचानक घारतून निघून गेल्या आहेत. दोघींही सोबत निघून गेल्या आहेत, याआधी त्या दोघीही अरबाजसोबत बोलत होत्या,तोच माझ्या मुलींना घेऊन गेला आहे. त्यानेच त्या दोघींनाही ब्लॅकमेल केलं आहे. आम्ही पोलिसांकडे गेलो, मात्र तो काहीच बोलत नाहीये, मला त्यांच्यावरतीच संशय आहे. तोच माझ्या मुलींना घेऊन गेला आहे, घरातून त्या सोनं देखील घेऊन गेल्या आहेत. मंगळसूत्र, चैन, बांगड्या, हे सगळं मुलींनी अरबाजला दिलं असल्याचं सांगितलं होतं, मी जेव्हा पाहिलं, घरी सोनं नव्हतं तेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी अरबाजला दिल्याचं सांगितलं होतं, तो माझ्या मुलींना ब्लॅकमेल करत होता, त्यांचे व्हिडीओ व्हायरल करेन, त्यांनी सांगितलं की, त्याने धमकी दिली त्यावेळी मुलींनी सोनं त्याला दिलं. प्रेमाच्या जाळ्यात त्यानं अडकवलं आणि सोनं वगैरे घेतलं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
Auto Rickshaw Permit : मोठी बातमी: राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना ब्रेक, आजपासून परवाने स्थगित; प्रताप सरनाईकांचा निर्णय
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना ब्रेक, आजपासून परवाने स्थगित; प्रताप सरनाईकांचा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
Devendra Fadnavis On T 20 World Cup : मुख्यमंत्री फडणवीसांकडून भारतीय संघाचं कौतुक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार  
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
Sangli Satyashodhak Wedding: सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
Embed widget