(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Budget 2022: अर्थसंकल्पाचं LIVE कव्हरेज कुठे, कधी पाहाल?
Union Budget 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) एक फेब्रुवारी, 2022 रोजी अर्थमंत्री म्हणून आपला चौथा अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर करणार आहेत.
Union Budget 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) एक फेब्रुवारी, 2022 रोजी अर्थमंत्री म्हणून आपला चौथा अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर करणार आहेत. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकारकडून मांडला जाणारा हा दहावा अर्थसंकल्प असेल.
अर्थसंकल्पीय अधिवेशन -
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी 2022 पासून सुरु होणार आहे. दोन्ही सभागृहातील राष्ट्रपतींच्या भाषणाने अर्थसंकल्पाला सुरुवात होईल. 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारीदरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे. एक फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
'बजेट'चा अर्थ -
बजेट हा फ्रेंच शब्द 'Bougette' या शब्दापासून आला आहे. बजेटचा अर्थ लहान चामड्याची पिशवी असा आहे.
स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प -
देश स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प हा 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर करण्यात आला. तत्कालीन अर्थमंत्री आर.के. शनमुखम चेट्टी यांनी मांडला. खरं पाहिलं तर तो एक अंतरिम अर्थसंकल्प होता. पुढे जाऊन 1948 साली मार्च महिन्यात देशाचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
अर्थसंकल्पाविषयी काही रंजक गोष्टी -
- गेल्या वेळचा म्हणजे 2020-21 सालचा अर्थसंकल्प हा पेपरलेस अर्थसंकल्प म्हणून ओळखला जातो.
- अर्थ मंत्रालय इतर संबंधित मंत्रालयांशी सल्लामसलत करून अर्थसंकल्प तयार करते.
- सन 2017 पर्यंत अर्थसंकल्प हा साधारण: फेब्रुवारीच्या 28 तारखेला किंवा एक मार्चला सादर केला जायचा. ही परंपरा खंडीत करण्यात आली आणि एक फेब्रुवारीला सादर करण्यात आला. तसेच रेल्वेचा सादर करण्यात येणारा स्वतंत्र अर्थसंकल्प बंद करण्यात आला आणि त्याचे विलिनीकरण हे मुख्य अर्थसंकल्पात करण्यात आले.
- अर्थसंकल्पाचे भाषण सरासरी 90 मिनिटं ते 120 मिनिटांपर्यंत असते.
- निर्मला सीतारमण यांनी 2021-22 मध्ये सर्वाधिक मोठं भाषण केलं होतं. 160 मिनिटांपर्यंत त्यांचं भाषण सुरु होतं.
- सीतारमण यांच्याआधी 2003 मध्ये जसवंत सिंह यांनी 135 मिनिटं भाषण केलं होतं.
- सर्वात छोटं अर्थसंकल्पीय भाषण हिरूभाई एम. पटेल यांनी केलं आहे. त्यांनी 1977 मध्ये फक्त 800 शब्दांचे भाषण केलं होतं.
यंदाचा अर्थसंकल्प कुठे पाहाल?
यंदाच्या अर्थसंकल्पाचे लोकसभा टिव्हीवर लाईव्ह प्रेक्षपण असणार आहे. त्याशिवाय डीडी न्यूजवरही LIVE पाहू शकता. तसेच त्यांच्या यूट्यूब चॅनल्सवरही पाहू शकता. त्याशिवाय, एबीपी माझाच्या संकेतस्थळावरही तुम्हाला अर्थसंकल्पाविषयक सर्व माहिती मिळेल.