एक्स्प्लोर
Advertisement
अंगावर आलं तर सोडणार नाही, बारमालकांना पोलिसांचा दम
उल्हासनगर : 'अभी माहोल खराब है, जब हमारी जान के उपर आता है तो हम किसीको छोडेंगे नही' हे वक्तव्य उल्हासनगरचे एसीपी अर्थात सहाय्यक पोलीस आयुक्तांनी केलं आहे. विशेष म्हणजे एसीपींनी हा दम भरला आहे एका बारमालकाला.
उल्हानगरमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरु असणारे डान्सबार 'माझा'नं उघडकीस आणल्यानंतर कारवाईऐवजी पोलिसांनी जणू पाहणी दौराच सुरु केला आहे. त्यामुळे 'तुमच्या अंगावर येणार तेव्हाच तुमचे तुमचे हात कारवाईसाठी धजावणार का?' असा प्रश्न एसीपींच्या बाबतीत उपस्थित होत आहे.
उल्हासनगरमधील डब्लूडब्लूएफ बार. तिथे उभ्या असलेल्या तरुणी या महिला वेटर असल्याचं बारमालक सांगतो. मात्र बारमध्ये महिला वेटरनी पूर्ण कपडे घालावेत, ग्राहकांपासून ठराविक अंतरावर उभं राहावं, असे काही नियम आहेत. हे मात्र पायदळी तुडवले जातात.
बारची पाहणी करताना पोलिसांसोबत चक्क शहराचे एसीपी आणि महापालिकेचे उपायुक्त देखील हजर आहेत. मात्र कारवाई शून्य.
ऑर्केस्ट्राच्या नावे डान्सबार, पोलिसांच्या खाबुगिरीचं कथित रेटकार्ड
उल्हासनगरमधील बे वॉच बार. मालकाला आधीच धाड पडणार याची खबर मिळाली होती, असं चित्र पोलिस इथे आल्यावर दिसलं. एवढ्या अलिशान बारमध्ये एकही गिऱ्हाईक नाही, ना एकही बारबाला. समोर माध्यमांचे कॅमेरे आहेत म्हटल्यावर पोलिसांनी वरच्या मजल्याची पाहणी केली. तो मजला पूर्णपणे अनधिकृत आहे. पाहणी दौऱ्यानंतर उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दोन्ही बारमध्ये अनधिकृत बांधकामं असल्याचं सांगितलं. मात्र या मजल्यावर गेल्या वर्षीच कारवाई केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहेय. जर गेल्या वर्षीच या मजल्यावर कारवाई केली होती, तर पुन्हा मजला उभा राहिला कसा, याचं उत्तर पोलिस आणि महापालिकेकडे नाही. बारच्या आतील छमछम रस्त्यावरुन जाणाऱ्या नवख्या माणसाच्याही कानावरही पडते. मात्र दिवस-रात्र सरकारी इंधन जाळून राऊंड मारणारे पोलिसांचे कान कशामुळे बधीर होतात, हे कळण्यापलीकडचं आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement