एक्स्प्लोर
उल्हासनगर महापालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची सरशी
या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला समर्थन दिलं होतं. तर या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेसच्या जया साधवानीदेखील रिंगणात होत्या, त्यांना अवघी 913 मतं पडली.
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या पॅनल क्रमांक 17 साठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुमन सचदेव या 2690 मतं मिळवत विजयी झाल्या. त्यांनी उल्हासनगर महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजप आणि टीम ओमी कलानीच्या उमेदवार साक्षी पमनानी वलेचा यांचा 200 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला समर्थन दिलं होतं. तर या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेसच्या जया साधवानीदेखील रिंगणात होत्या, त्यांना अवघी 913 मतं पडली.
या प्रभागात राष्ट्रवादीच्या तत्कालीन नगरसेविका पुनमकौर लबाना यांचं जातवैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे त्यांचं नगरसेवपद रद्द करत इथे पोटनिवडणूक घेण्यात आली. यात कुख्यात डॉन पप्पू कलानी याचा मुलगा ओमी कलानी याने भाजप उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मोठा जोर लावला होता, मात्र अखेर राष्ट्रवादीला आपला गड राखण्यात यश आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement