एक्स्प्लोर
कुरिअर मॅन असल्याचं सांगून 70 वर्षीय वृद्धेला लुटलं
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी अविनाश कुमार शुक्ला आणि हरिओम शर्मा या दोन जणांना चार दिवसांत गजाआड केलं.
मुंबई : कुरिअर मॅन असल्याचं सांगून 70 वर्षीय महिलेला घरात बांधून ठेवून लुटल्याची घटना मीरा रोड परिसरात घडली. या प्रकरणात काशीमिरा स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी अविनाश कुमार शुक्ला आणि हरिओम शर्मा या दोन जणांना चार दिवसांत गजाआड केलं. तसंच त्यांच्याकडून एकूण दोन लाख 70 हजार रुपये असा मुद्देमाल जप्त केला.
अविनाश कुमार शुक्ला आणि हरिओम शर्मा हे दोघे 23 जुलैला गौरव व्हॅल या हाय प्रोफाईल सोसायटीमधील ऑर्किड बिल्डिंगमध्ये कुरिअर मॅन बनून दाखल झाले. घरात 70 वर्षीय पुष्पा शुक्ला या एकट्याच होत्या. शुक्ला यांनी कुरिअर घेण्यासाठी दार उघडलं आणि दोघे जण घरात शिरले.
दोघांनी पुष्पा यांना चाकूचा धाक दाखवला, तसंच त्यांचे हात पाय बांधून तोंडाला चिकटपट्टी लावली. त्यानंतर घरातील सोन्या चांदीचे दागिने, घड्याळ आणि रोख रक्कम असा एकूण तीन लाख 35 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
पुष्पा शुक्ला यांचा मुलगा विक्रम शुक्ला यांनी काशीमिरा पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
--
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement