एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांच्या नावाने नगरसेवकाकडे 10 कोटींची मागणी, तोतया अटकेत
शिरगावकरने विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती करण्यासाठी ठाण्यातील भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरेंकडे 10 कोटींची मागणी केली.
ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हुबेहूब आवाज काढत 10 कोटींची खंडणी उकळणाऱ्या महाठगाला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अनुद शिरगावकर असं या इसमाचं नाव आहे.
शिरगावकरने विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती करण्यासाठी ठाण्यातील भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरेंकडे 10 कोटींची मागणी केली. एका महिलेने मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं करुन देत असल्याची बतावणी केली. यानंतर अनिल भानुशाली नावाच्या तिच्या साथीदाराने फोनवर मुख्यमंत्र्यांचा आवाज काढला.
यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचून अनुद शिरगावकरसह एका महिलेला अटक केली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या महाठगाने आणखीही काही जणांना गंडा घातल्याचा पोलिसांना संशय आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement