एक्स्प्लोर
एक हजार कोटींच्या ड्रग्स प्रकरणात अजून तिघांना अटक; कंपनीच्या मालकासह दोन कर्मचाऱ्यांचा समावेश
एक हजार कोटींच्या ड्रग्स प्रकरणी कंपनीच्या मालकाला आणि त्याच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई : डायरेक्टरेट ऑफ रेव्हन्यू इंटेलीजनस (DRI) च्या अधिकाऱ्याने ड्रग्सच अंतर्राष्ट्रीय रॅकेट उध्वस्त केलं आहे. 1000 कोटी किमतीच्या 191 किलो नावाशिवा येथून हे ड्रग्स जप्त करण्यात आले. या संदर्भात ज्या कंपनीच्या नावे हे ड्रग्स आले होते. त्या कंपनीच्या मालकाला आणि त्याच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये आधीच दोघांना अटक करण्यात आली असती. सुरेश भाटीया हा दिल्लीमध्ये असलेल्या सर्विस एक्सपोर्ट्सचा मालक असून मोहम्मद नौमान आणि महेंद्र निगम या दोन कर्मचाऱ्यांना दिल्लीतून अटक करून सोमवारी मुंबईत आण्यात आलं.
निगम हा सुरेश भाटियासाठी नौमानच्या सांगण्यावरून लॉजिस्टिकच काम पाहायचा, नौमान भाटियाचा अत्यंत विश्वासू माणूस असून आयात करण्यापासून ते ड्रग्सच्या डिलिव्हरी पर्यंत सर्व काम तो स्वतः पहायचा आणि स्वतःच्या देखरेखीमध्ये ती काम करून घ्यायचा.
सुरेश भाटियावर याआधीच सुद्धा गुन्हा दाखल आहे, 2008 मध्ये हा आशिषच्या स्मगलिंगमध्ये तू आरोपी होता तर त्याचा विश्वासू नौमानवर सुद्धा यापूर्वी गुन्हा दाखल आहे. आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे की, नौमानला कस्टम क्लिअरिंगची जबाबदारी देण्यात आले होती, तसेच नौमान हे ड्रग्स मीनानाथ बोडके आणि कोंडी भाऊ गुंजल या दोघांना पोहोचवायचा, या दोघांना आधीच शनिवारी अटक करण्यात आली.
नवी मुंबई च्या नेरुळमध्ये राहणारा बोडके एम बी शिपिंग कंपनी आणि लॉजिस्टिक सोल्युशन्स मध्ये पार्टनर होता, या कंपनी कन्साईन्मेंट कंटेनर नंबर INKU2267955 क्लियर करण्याची जबाबदारी होती. नौमानच्या म्हणण्यावरून बोडके कस्टममधून पार्सल काढून द्यायचा, नौमान आणि बोडकेची ओळख बोडकेचा नातेवाईक असलेला गुंजाळ जो मुंब्रा मध्ये राहतो त्यानी करून दिली होती. नौमान आणि बोडके जुन 2019 पासून संपर्कात होते.
नौमान ने गुंजाळला कस्टम क्लिअरन्सची जबाबदारी सोपवली होती. त्याच्या मोबदल्यात त्याला भलंमोठं कमिशन देण्याचं आमीष दिल होत. गुंजाळनेही त्याला होकार दिला.
बोडके आणि गुंजाळ यांनी ड्रग्स पार्सल कस्टम्समधून क्लिअर करून देण्यास मदत केली होती. जे स्पष्ट झाला आहे त्यांना 14 दिवसांची ज्युडिशीयल कस्टडी सुनावण्यात आली आहे. ज्या कंपनीच्या नावावर हे ड्रग्सच पार्सल आलं होतं, त्या कंपनीचा मालक भाटिया आणि त्याचे दोन कर्मचारी नोमान आणि निगम यांना सुद्धा अटक करून त्यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- धक्कादायक...! महिला IAS अधिकाऱ्याची सोशल मीडियावर तब्बल 16 फेक अकाउंट्स
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या बँक खात्यांवर सायबर चोरांचा डोळा
- गृहमंत्र्यांच्या नागपुरात चोरीचं सत्र सुरुच; पोलीस बंदोबस्त असतानाही कोरोनामुळे सील केलेल्या घरात चोरी
- पोलिसाच्या घरी चोरी, तक्रारीनंतर पोलिस म्हणतात, 'ते' घर सॅनिटाईझ नसल्यानं तपासाला जाणार नाही!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement