शिवसेना नेते संजय राऊत यांनाही धमकीचा फोन; कोलकातामधून एकास अटक
शिवसेना नेते संजय राऊत यांनाही धमकीचा फोन केल्याप्रकरणी कोलकातामधून एकास अटक करण्यात आली आहे.
मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना धमकीचा फोन करणाऱ्या एका व्यक्तीला कोलकाता पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी काल (गुरुवारी) कोलकाता मधून अटक केली. शहरातील टॉलीगंगे भागातून पलाश बोस नावाच्या व्यक्तीस अटक केली आहे. त्याला आज अलिपूर कोर्टात हजर केले जाईल. आरोपीवर राऊत यांना इंटरनेट कॉलिंग केल्याचा आरोप केला जात होता.
टॉलीगंगे येथील रहिवासी पलाश बोस याला काल रात्री पोलिसांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना धमकी देण्याच्या आरोपाखाली अटक केलं आहे. पलाश हा कंगनाचा समर्थक आहे आणि म्हणूनच कॉल केल्याचे सांगितले जात आहे. आज दुपारी 1 वाजता अलिपूर कोर्टात त्याला हजर करण्यात येणार होते.
मुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक महत्वाच्या नेत्यांना धमकीचे फोन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला आहे. देशाबाहेरुन हा फोन कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी रविवारी हा फोन आला होता. गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान ही धमकी जीवे मारण्याची आहे की खंडणीबाबत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर कंगना रनौतप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन आल्याचं कळतं. कालच त्यांना हा फोन आल्याचं कळतं. हा फोन मात्र भारतातून असल्याचं कळतं.
मुख्यमंत्र्यांपाठोपाठ शरद पवार आणि अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन
गृहमंत्री काय म्हणाले होते? "कंगनाने मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केली आहे. त्यामुळे तिला महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस हे सक्षम पोलीस दल आहे. त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते. अशा पोलिसांविषयी एखादी अभिनेत्री बोलत असेल तर योग्य नाही. त्यांना जर सुरक्षित वाटत नाही तर त्यांनी मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही," असं गृहमंत्री अनिल देशमुख काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. यावरुनच त्यांना कालच धमकीचा फोन आला.
Sanjay Raut | सोनिया गांधी, शरद पवार हे मुख्यमंत्री ठाकरेंवर नाराज नाहीत : संजय राऊत होता.