एक्स्प्लोर
ठाणे शहराचा पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार
ठाण्यात स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बुधवार दिनांक 25 एप्रिल 2018 रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून गुरुवार दिनांक 26 एप्रिल 2018 रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
![ठाणे शहराचा पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार Thane Water Supply to be cut for 24 hours latest update ठाणे शहराचा पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/31083321/Water_Cut.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे : ठाण्यातील काही भागात उद्या, म्हणजे बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बुधवार दिनांक 25 एप्रिल 2018 रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून गुरुवार दिनांक 26 एप्रिल 2018 रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्याटप्याने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
कोणत्या भागात कधी पाणीपुरवठा बंद?
बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ इत्यादी परिसरात पाणी पुरवठा बंद राहील.
बुधवारी रात्री 9 वाजल्यापासून गुरुवार सकाळी 9 वाजेपर्यंत समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेवर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर आणि कळव्याचा काही भाग या परिसरांचा पाणी पुरवठा बंद राहील.
बुधवार दिनांक 25 एप्रिल 2018 रोजी सकाळी 9 ते गुरुवार दिनांक 26 एप्रिल 2018 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत (24 तास) ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)