एक्स्प्लोर
ठाण्यात 4 दिवसांच्या अर्भकाच्या पोटात अविकसित गर्भ
अवघ्या चार दिवसांच्या अर्भकाच्या पोटात गर्भाचा अविकसित अंश असल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे.

ठाणे : बाळाच्या पोटात गर्भ आढळणं ही बाब दुर्मिळ आहे. ठाण्यातील मुंब्र्यामध्ये एका दाम्पत्याच्या अर्भकाबाबत ही घटना घडली आहे. चार दिवसांच्या बाळाच्या पोटात आढळलेला गर्भ शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आला. चार दिवसांपूर्वी मुंब्र्यातील दाम्पत्याला मुलगा झाला. त्याचं पोट फुगीर असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं. काही चाचण्यांनंतर हा प्रकार डॉक्टरांच्या लक्षात आला. या प्रकाराला ‘पिट्स इन पिटू’ असं संबोधलं जातं. बाळाच्या पोटातील गर्भसदृश्य गाठ काढून त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. ठाण्याच्या मानपाडा भागातील टायटन रुग्णालयात जवळपास अडीच तास हे ऑपरेशन चाललं. बाळ गर्भात असल्यापासूनच रेडिओलॉजिस्ट डॉ. भावना थोरात यांनी याबाबत पालकांना कल्पना दिली होती. आता शस्त्रक्रिया करुन अविकसित गर्भाचा सूक्ष्म अंश काढण्यात आला.
आणखी वाचा























