एक्स्प्लोर
तळोजा जेलमधील मोक्का प्रकरणातील आरोपी फरार

नवी मुंबई: नवी मुंबईच्या तळोजा कारागृहातील मोक्का प्रकरणातील आरोपी फरार झाला आहे. हनुमंत उर्फ प्रेम पाटील असं पोलिसांच्या तावडीतून पळ काढलेल्या आरोपीचं नाव आहे. पाटील याला अपहरण, हत्येच्या गुन्हासारख्या विविध गुन्ह्यांखाली पनवेल पोलिसांनी कामोठेमधून अटक केली होती. तळोजा कारागृहातून मुंबईत जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेलं असता, तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. दीड वर्षांपासून तो तळोजा कारागृहात होता. दरम्यान, पळ काढणाऱ्या हनुमंतचा पोलिसांनी रुग्णालयात कसून शोध घेतला. यामुळे जेजे रुग्णालयात मोठा गोंधळ उडाला. यानंतर पोलिसांनी याची माहिती जेजे मार्ग पोलिसांना कळवली. आता पनवेल पोलीस आणि जेजे मार्ग पोलीस हनुमंत पाटील याचा कसून शोध घेत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम
भारत























