Suraj Chavan : सूरज चव्हाण यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला, 25 जानेवारीपर्यंत तापसयंत्रणेच्याच ताब्यात ठेवण्याचे निर्देश
Suraj Chavan : कथित खिचडी घोटाळ्याप्रकणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या कोठडीतील मुक्कामामध्ये वाढ झाली आहे.
मुंबई : आदित्य ठाकरेंचे (Aaditya Thackeray) निकटवर्तीय असलेल्या सूरच चव्हाण (Suraj Chavan) यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कथित कथित खिचडी घोटाळ्याप्रकणी सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. दरम्यान त्यानंतर त्यांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. पण आता त्यांना 25 जानेवारीपर्यंत तपासयंत्रणेच्याच ताब्यात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सूरज चव्हाण यांना ईडीने (ED) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं होतं. दरम्यान ईडीने केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा करत सूरज चव्हाण यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीये.
याआधी 17 जानेवारी रोजी सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. त्यातच ईडीने सूरज चव्हाण यांची 8 दिवसांची ईडी कोठडी मागितली होती. परंतु त्यांना 22 जानेवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण आता पुन्हा एकदा सूरज चव्हाण यांच्या कोठडीत वाढ करण्यात आलीये.
नेमकं प्रकरण काय?
कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेने एकूण 52 कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. या कामात घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचे नाव यामध्ये घेण्यात आलं होतं.
सूरज चव्हाण यांचा काय संबंध?
ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडून काही सब टेंडर देण्यात आले, ज्यामध्ये वैद्यकीय साहित्य आणि सेवा पुरवण्याचे सब टेंडर होते. असं टेंडरशी संबंध सुरज चव्हाण यांचा येतो, त्यामुळे या संपूर्ण कंत्राटामध्ये आर्थिक व्यवहार होताना नियमांचं उल्लंघन झालं का? यामध्ये कुठल्या प्रकारचा गैरव्यवहार करण्यात आला का? या सगळ्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान आता सूरज चव्हाण यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकणात सूरज चव्हाण यांना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.