एक्स्प्लोर
मुंबईत मॉडेलची मित्राकडून हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला
पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत अवघ्या तीन तासात प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपीला जेरबंद केलं. त्याने या हत्येची कबुली दिली आहे.

मुंबई : मॉडेल मैत्रिणीची मित्रानेच हत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईत घडली. धक्कादायक म्हणजे या आरोपीने मॉडेलचा मृतदेह बॅगेत भरुन मालाड परिसरात फेकला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत अवघ्या तीन तासात प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपीला जेरबंद केलं. त्याने या हत्येची कबुली दिली आहे.
मानसी दीक्षित असं या मॉडेलचं नाव असून ती मूळची राजस्थानची आहे. तिचा मित्र मुझाम्मील सय्यद याने तिची हत्या केल्याचं उघडं झालंय. अवघ्या तीन तासात पोलिसांनी या हत्येचा छडा लावला.
मूळचा हैदराबादचा असलेल्या मुझाम्मीलने मानसीला त्याच्या ओशिवाराच्या घरी बोलवलं होतं. दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. यावेळी मुझाम्मीलने मानसीच्या डोक्यात जड वस्तू मारली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर आरोपी मुझाम्मीलने मानसीचा मृतदेह बॅगेत भरला आणि रिक्षा करुन या मृतदेहासहीत ही बॅग मालाडमधील एका रोडवर सोडून दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रिक्षाचा शोध घेतला, त्यानंतर आरोपीचं घर गाठलं आणि आरोपीला अटक केली. या संपूर्ण तपासात डीसीपी संग्राम सिंग निशांदर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बीड
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
