Sonia Gandhi : मुंबईतील सभेला सोनिया गांधींची उपस्थिती, लोकसभेच्या प्रचाराचा नारळ ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातून फोडणार!
Bharat Jodo Nyay Yatra : मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीकडून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत.
Sonia Gandhi मुंबई : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात धडकली. ही यात्रा आता अंतिम टप्प्यात असून उद्या मुंबईत यात्रेची सांगता होणार आहे. यानिमित्त मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर इंडिया आघाडीकडून (India Alliance) जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. देशात एकूण सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. या निमित्त सर्वच पक्षांनी कंबर कसली असून एनडीएला हरवण्यासाठी इंडिया आघाडी जोमाने तयारी करत आहे. उद्या शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार असून या सभेला गांधी परिवारातील सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातून फोडण्यात येणार आहे. या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
ठाकरे-पवारांसह अनेक बड्या नेत्यांची उपस्थिती
या जाहीर सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, बिहारमधील राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते तेजस्वी यादव, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे देखील उपस्थित असतील. या सभेत राहुल गांधी काय बोलणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
धारावी स्कीलचं कॅपिटल - राहुल गांधी
मागील सात दिवसांपासून मी भाषण देतोय. एका वर्षाआधी आम्ही भारत यात्रा केली. आमचा विचार होता नफरत बाजारात आम्हाला मोहब्बतचं दुकान उघडायचं होतं. अनेकांनी म्हंटलं अनेक ठिकाणी आपण नाही गेलात. त्यामुळे आम्ही मणिपूर ते मुंबई ही यात्रा केली. मुंबईत ही यात्रा समाप्त नाही होत आहे तर धारावीत समाप्त होत आहे. धारावी स्कीलचं कॅपिटल आहे. सुरुवात आम्ही मणिपूरमधून केली कारण सिव्हिल वॉरचं वातावरण भाजपनं तयार केलंय. ही लढाई धारावी आणि अदानीमध्ये आहे. यात्रेत आम्ही न्याय हा शब्द जोडला कारण गरीब, शेतकरी कामगार वर्गासोबत अन्याय होतोय. अदानी आणि अंबानी हीच दोन नावं बघायला मिळतात. धारावीतील जमीन तुमची आहे, आणि हेच दलाल लोक तुमची जमीन घेऊ पाहात आहेत. अदानींच्या मागे मोदी आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या