एक्स्प्लोर
शिवसेनेचं पोस्टर, नारायण राणेंवर विखारी टीका
वरळी नाक्यावर शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी हे पोस्टर लावलं. ज्यात नारायण राणेंबाबत अत्यंत खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे.
मुंबई: नारायण राणेंच्या संभाव्य भाजप प्रवेशावरुन शिवसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं वरळीत लावलेल्या एका पोस्टरमधून राणेंवर अत्यंत विखारी भाषेत टीका केली आहे.
वरळी नाक्यावर शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी हे पोस्टर लावलं. ज्यात नारायण राणेंबाबत अत्यंत खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे.
अरविंद भोसले यांनी राणे यांच्या नव्या राजकीय वाटचालीवर व्यंगात्मक भाष्य करणारे होर्डिंग वरळी नाक्यावर चर्चेचा विषय बनलं आहे.
या होर्डिंगमध्ये भाजपलाही लक्ष्य करण्यात आलं आहे. होर्डिंगमध्ये रेखाटण्यात आलेली चित्रे आणि त्यातील भाषा वादग्रस्त आहे. राणेंनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर शिवसेनेनं प्रतिक्रिया देण्याचं टाळलं होतं, पण आता पोस्टर लावून शिवसेनेनं राणेंच्या विरोधात आवाज उठवलेला पाहायला मिळतोय.
राणेंचा भाजप प्रवेश नक्की झाल्यास हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement