एक्स्प्लोर
महापालिका निवडणुकीनिमित्त शिवसेनेचं नवं गाणं लॉन्च
मुंबई: महापालिका निवडणुकीनिमित्त शिवसेनेनं आपलं नवं गाणं काल गोरेगावमधील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात लॉन्च केलं आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शिवसेनेच्या या नव्या गाण्याला शिवसैनिकांकडूनही मोठी दाद मिळत आहे.
शिवसेनेचं हे नवं गाणं गीतकार मंदार चोळकर याने लिहलं असून, याला संगीतबद्ध करण्याचं काम स्वप्नील गोडबोले या नव्या दमाच्या संगीतकारानं केलं आहे. शिवसेनेचं हे नवं गाणं स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांनी गायलं आहे.
या गाण्यातूही शिवसैनिकांना लढण्यासाठी आवाहन केलं गेलं आहे. तसेच गेल्यावर्षीच्या शिवसेनेच्या 'करुन दाखवलं' या टॅगलाईनला धरुन हे गाणं लिहण्यात आलं आहे.
गाण्याचा व्हिडीओ पाहा
या आधीही 2014 साली शिवसेनेने अशाच प्रकारचे गाणे लॉन्च केले होेते. तेही गाणे संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement