एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपचे ‘पहारेकरी’ असले, तरी आमची सिक्युरिटी टाईट असेल : अनिल परब
मुंबई : मुंबई महापालिकेत पारदर्शक कारभार चालावा म्हणून भाजप पहारेकऱ्याच्या भूमिकेत असला, तरी आमची पारदर्शकतेची सिक्युरिटी आणखी टाईट असेल, असे शिवेसना आमदार अनिल परब म्हणाले. एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’वर अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या महापौरपदासह विविध मुद्द्यांवर मनमोकळा संवाद साधला.
शिवसेनेकडे पुरेसं संख्याबळ होतं. त्यामुळे शिवसेनेचाच महापौर मुंबई महापालिकेत बसणार, याची आधीपासूनच खात्री होती, असे अनिल परब म्हणाले. शिवाय, काहीही झालं तरी मुंबईत शिवसेनेचाच महापौर निवडून येणार असा विश्वास होता, असेही त्यांनी सांगितलं.
मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीतून भाजप किंवा मुख्यमंत्र्यांनी कशाच्या आधारावर माघार घेतली, हे तेच सांगू शकतील. शिवाय, भाजपची माघार ही एकतर्फी आहे, असे अनिल परब म्हणाले.
नागपुरात पारदर्शकत नको, मुंबईतच पारदर्शकता हवी, हे कुठले निकष?, असा सवाल अनिल परब यांनी ‘माझा कट्टा’वरुन भाजपला विचारला. शिवाय, राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पारदर्शकता हवी, यासाठीही आम्ही आग्रही असल्याचे परब यांनी सांगितले.
वीस वर्षे ज्यांच्यासोबत मैत्री होती, त्यांच्याकडून आरोप झाल्यानंतर दु:ख झालं, असे सांगालायलाही अनिल परब विसरले नाहीत.
अनिल परब यांचे ‘माझा कट्टा’वरील महत्त्वाचे मुद्दे –
- शिवसेनेचा महापौर होणार, याची खात्री होती - अनिल परब
- शिवसेनेकडे पुरेसं संख्याबळ होतं - अनिल परब
- निवडणूक हे युद्धशास्त्र आहे, यात कुणी कधीच कुणाशी बोलायचं नसतं - अनिल परब
- काहीही झालं तरी, शिवसेनेचा महापौर निवडून येणार, असा विश्वास होता - अनिल परब
- लढताना समोरचा काय करतोय हे बघत नाही - अनिल परब
- मुख्यमंत्र्यांनी कशाच्या आधारावर निर्णय घेतला, हे तेच सांगू शकतील - अनिल परब
- भाजपने एकतर्फी माघार घेतलीय - अनिल परब
- नागपुरात पारदर्शकता नको, मुंबईत पारदर्शकता हवी, हे कुठले निकष? - अनिल परब
- मंत्री गोपनियतेची शपथ घेतात आणि एसएमएसवरुन बातम्या बाहेर पाठवतात - अनिल परब
- भाजप पहारेकरी बसवणार असतील, तर पारदर्शकतेची आमची सिक्युरिटी आणखी टाईट असेल - अनिल परब
- स्वतंत्र लढलोय, तर महापौर आपल्या ताकदीवर बसायला हवा, अशी शिवसैनिकांची इच्छा - अनिल परब
- 20 वर्षे ज्यांच्याशी मैत्री, त्यांच्या आरोपांमुळे दु:ख झालं - अनिल परब
- दिशाभूल करुन सेनेच्या बदनामीचा प्रयत्न झाला – अनिल परब
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement