एक्स्प्लोर
शिवसेनेलाच बाळासाहेबांच्या पुतळ्याचा विसर
नोव्हेंबर 2016 मध्ये मुंबई महापालिकेनं दक्षिण मुंबईतल्या कुलाबा येथे महाराष्ट्र पोलीस मुख्यालयासमोर बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा उभारण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यासाठी नियम शिथील करुन वाहतूक बेटावर पुतळा उभारण्याची परवानगीही देण्यात आली होती.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकतेच बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईच्या महापौर बंगल्याचं हस्तांतरणही पूर्ण झालं आहे. मात्र शिवसेनेनेच मंजूर केलेल्या बाळासाहेबांच्या दक्षिण मुंबईतील पुतळ्याचा मात्र विसर पडला आहे.
दोन वर्षापूर्वी महापालिकेत ठराव मंजूर केलेला बाळासाहेब ठाकरेंचा दक्षिण मुंबईतील पुतळा लालफितीत अडकला आहे. शिवसेनेला आपल्याच संकल्पाचा विसर पडला असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
नोव्हेंबर 2016 मध्ये मुंबई महापालिकेनं दक्षिण मुंबईतल्या कुलाबा येथे महाराष्ट्र पोलीस मुख्यालयासमोर बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा उभारण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यासाठी नियम शिथील करुन वाहतूक बेटावर पुतळा उभारण्याची परवानगीही देण्यात आली होती.
यासाठी स्वत: उद्धव ठाकरेंनी जागेची पाहणीही केली, शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी महापालिकेतील प्रशासकीय कामातही लक्ष घातले. मात्र, नंतर बाळासाहेबांचा पुतळा लालफितीत अडकला आहे. या पुतळ्यासाठीच्या अनेक परवानग्या अजूनही रखडवेल्याच आहेत. ज्याकडे आता शिवसेनेचंच लक्ष नसल्याचे चित्र आहे.
महापौर बंगल्याची जागा बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीला हस्तांतरित
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं शिवसैनिकांचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीदिनी महापौर बंगल्याची जागा बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीला हस्तांतरित केली गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबातील इतर सदस्य तसेच शिवसेनेच्या प्रमुख्य नेत्यांच्या उपस्थितीत गणेश पुजनानं बाळासाहेबांच्या स्मारकाचा श्रीगणेशा झाला आहे.
महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं अंडरग्राऊंड स्मारक बांधलं जाणार आहे. महापौर बंगल्याची 2300 स्क्वेअर फुटाची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कमी पडली असती. म्हणून बंगल्याच्या मागच्या आणि पुढच्या जागेचाही स्मारकासाठी वापर केला जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement