एक्स्प्लोर

राज्य सरकार प्रत्येकवेळी एक आभासी आकडा फेकतात; देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर फडणवीस यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्य सरकारवर आरोप केले आहेत.

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने राज्याला कशी मदत केली, याची माहिती देण्यासाठी काल (मंगळवारी) पत्रकार परिषद घेतली. त्यावर महाविकास आघाडीने आज तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत फडणवीस यांनी केलेला प्रत्येक आरोप खोडून काढला. यावर परत फडणवीस यांनी फेसबुक लाईव्ह करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या आकडेवारी खोटी असल्याचा आरोप केलाय. फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रावादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि काँग्रेसकून बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकार परिषद घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी आभासी पत्रकार परिषद घेतली त्याला आम्ही उत्तर देतोय. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या समोर गोष्टी ठेवून असं चित्र उभं केले की केंद्र सरकार भरघोस मदत देऊनसुद्धा महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत आहे. लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून सत्य परिस्थिती समोर मांडतोय, असं शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं. तर, फडणवीस यांना मुख्यमंत्री उपलब्ध नसतील तर उपमुख्यमंत्री अजितदादाना भेटावं, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. केंद्राकडून राज्याला कोणताही स्वतंत्र निधी नाही, महाविकास आघाडीचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुक लाईव्ह घेत. राज्य सरकारला केंद्र कशी मदत करत आहे, त्याची पुन्हा आकडेवारी दिली. राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. हे सरकार ही परिस्थिती हाताळायला अपयशी ठरले आहे. केंद्राने मदत करुनही हे सरकार मान्य करत नसल्याची गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. राज्य सरकार दरवेळी काहीतरी आभासी आकडेवारी फेकत असल्याचं फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक लाईव्ह मधील महत्वाचे मुद्दे
  • रेल्वेच्या तिकीटांसाठी राज्य सरकार सात ते नऊ लाख रुपये देते. मात्र, केंद्राला ती रेल्वे चालवण्यासाठई 50 लाख रुपये लागतात.
  • कापूस खरेदीसाठी सर्व पैसे केंद्र सरकार देते. त्याप्रमाणे ते पैसे केंद्राने दिले आहेत.
  • टॅक्सचे पैसे खातेदाऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले आहेत.
  • 26 मे पर्यंत महाराष्ट्राला 9 लाख 88 लाख पीपीई किट देण्यात आले आहे. 16 लाख एन 95 मास्क दिले आहेत. ही सामुग्री विकत घेण्यासाठी 468 कोटी रुपये केंद्राने राज्याला दिले आहेत.
  • मुंबईत कोरोना चाचणी कमी करण्यात आल्या आहेत. संपूर्ण देशात 5 टक्के लोक पॉझिटिव्ह निघतात. त्यापैकी महाराष्ट्रात हे प्रमाण 12 ते 13 टक्के आहे. तर, मुंबईत मे महिन्यात हे प्रमाण 32 टक्के इतके आहे.
  • दिव्यांगांना केंद्राने दिलेले 122 कोटी रुपये रेग्युलरपेक्षा जास्त पैसे दिले आहेत.
  • प्रत्येक वेळेस एक आभासी आकडा फेकायचा आणि केंद्राकडून पैसे येणे बाकी आहे, इतकंचं सांगण्याचं काम राज्य सरकारकडून सुरू आहे.
  • केंद्राने नोव्हेंबर आणि डिसेंबर पर्यंत राज्याचे जीएसटीचे पैसे दिले आहेत. त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल, असा प्रकार राज्य सरकारकडून चालला असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
  • मजुर गेल्यामुळे राज्याचे नुकसान होत आहे.
  • मुंबईत लोकांना खाटा मिळत नाहीत. वेळेवर उपचार मिळत नसल्याने लोकांचे बळी जात आहेत. देशातील 40 टक्के हे महाराष्ट्रात होत आहेत.
  • केवळ खोटी आकडेवारी देऊन लोकांच्या डोळ्यात धुळफेक सुरू आहे. आम्ही नेहमीचं राज्य सरकारच्या पाठीशी उभे आहोत.
Devendra Fadnavis | केंद्र सरकारनं महाराष्ट्राला 28 हजार कोटी रुपये दिले : देवेंद्र फडणवीस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Daryapur Rada : दर्यापुरात राडा करणाऱ्यांना सकाळी 10 वाजेपर्यंत अटक करा -नवनीत राणाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget